मंगळवेढा नगरपालिकेच्या गावठाण भागात अतिक्रमण ; मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संताप

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या निषेधार्थ गुरुवारी हलगीनाद आंदोलन

मंगळवेढा, दि.26 : मंगळवेढा नगरपरिषद हददीतील गावठाण भाग मध्ये झालेल्या अतिक्रमणावर कारवाई न करता मुख्याधिकारी व कर्मचारीवर्ग चालढकलपणा करतात उलट अतिक्रमण विरोधी कारवाई पुढे नेत अतिक्रमणधारकास मदत करतात ही भावना माळी गल्लीतील नागरिकांची निर्माण झाली आहे, त्यामुळे या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्याधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या निषेधार्थ गुरुवार दि.27 रोजी नगरपालिकेवर हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील रहिवाशांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोला नाका येथून काही अंतरावर असणा-या एका महाविदयालयासमोर एक इसम गेली 1 वर्षापासून टप्याटप्याने अतिक्रमण करत असून, आतापर्यंत त्याठिकाणी तीन गाळयाचे पत्राशेड बनवले असून जवळपास 1 एकर परिसराला तारेचे कंपाउंड केले असून माझीच जागा असल्याच्या अविर्भावात तो सध्या वावरत आहे.

सदरच्या अतिक्रमणाबाबत परिसरातील नागरिकांनी याअगोदर मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना वारंवार माहिती देवून परिसरातील नागरिकांच्या सहयानिशी निवेदनही दिले आहे. सदर जागा ही गावठाण हददीतील असल्याचे मुख्याधिकारी यांनी मान्यही केले होते. त्यानुसार दि.05/02/2025 रोजी नगरपालिकेच्यावतीने सदर अतिक्रमणधारकास 5 दिवसाचे आत अतिक्रमण काढण्याची नोटीस देखील बजावली होती. परंतु अजूनही त्यावर कारवाई झालेली नसून, मुख्याधिकारी हे अतिक्रमण काढणेस टाळाटाळ करीत असून व वेळकाढूपणा व चालढकल करीत आहेत. अतिक्रमणाबाबत मुख्याधिकारी यांची भूमिका शंकास्पद असल्याने त्यांच्याबद्दल या परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त केला जात आहे.

वेळोवेळी मागणी करूनही अतिक्रमण हाटवले जात नसल्याने तसेच मुख्याधिकारी, इतर कर्मचारी यांच्या वेळकाढू व चालढकलपणा करणे या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी परिसरातील पुरुष, लहान मुले, महिला यांच्यासह न.पा.कार्यालयावर हलगीनाद आंदोलन करणार असल्याचे निवेदनाद्वारे सूचित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here