जय भवानी, जय शिवाजी ; शिवजयंती उत्सवात महिलांच्या भगवा फेटा रॅलीतून महिला शक्तीचा जयघोष

सार्वजनिक शिवजयंतीत प्रा. तेजस्विनी कदम यांच्या संकल्पनेला मोठा प्रतिसाद

मंगळवेढा, दि.१९ : शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मंगळवेढा शहरातील महिलांच्या भगवा फेटा पदयात्रेत शहर व परिसरातील हजारो महिलांनी सहभाग घेत ही पदयात्रा ऐतिहासिक केली सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या शिवजयंती निमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या संचालिका तथा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका तेजस्विनी कदम यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी महिलांची भगवा फेटा रॅली मंगळवेढा शहरातून काढण्यात येते.

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड सुजित कदम यांच्या नियोजनातून मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कूल प्रशालेतून महिलांची ही भव्य रॅली संपन्न होते या रॅलीमध्ये सुरुवातीस उपस्थित सर्व महिलांना भगवा फेटा बांधण्यात येतो संबळ ढोल ताशा झांज पथकाच्या गजरात संत दामाजी यांच्या पुतळ्यास प्रा तेजस्विनी कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या चौकातून ही रॅली शिवप्रेमी चौकाकडे निघाली तिथून मारुतीच्या पटांगणामध्ये उत्सवमूर्ती जवळ या रॅलीचा समारोप झाला यावेळी तेजस्विनी कदम यांनी प्रत्येकाच्या घरात जिजाऊचे संस्कार निर्माण झाले तरच भविष्यात महाराजांच्या विचारांचे पिढी तयार होणार असल्याचे सांगत महिलांनी शिवचरित्र आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी शिवाजी महाराजांची वंदना करून जयघोष करण्यात आला  यावर्षी या रॅलीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ बाल शिवाजी यांची वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांसह तुतारी फुंकणारे विद्यार्थी याशिवाय शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा हा देखावा देखील सादर करण्यात आला महिलांच्या भगवा फेटा रॅलीस शिवशंभो महिला पतसंस्था, जिजामाता महिला पतसंस्था, धनश्री महिला पतसंस्था, समृद्धी महिला पतसंस्था आदी संस्थांच्या संचालिकासह महिला कर्मचारी शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा महिला वर्ग व गावातील प्रतिष्ठित सार्वजनिक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

रॅलीमध्ये प्रशालेतील व ज्युनिअर कॉलेज दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र महाविद्यालय तसेच फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मोठा सहभाग नोंदवला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here