मंगळवेढा, दि.०५ : स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील सारिका संतोष पवार यांना सखी प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वयं शिक्षण संस्थेच्या संस्थापिका स्वर्गीय प्रेमाताई गोपालन यांनी स्वयंशिक्षण संस्थेचे कार्य एकूण 7 राज्यामध्ये सुरू आहे. संस्थेच्या संस्थापिका स्वर्गीय प्रेमाताई गोपालन यांनी तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त 1 फेब्रुवारी 2025 हा दिवस पुणे येथे प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या संस्थेच्या माध्यमातून वंचित घटकातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्व जागृती करुन देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याची कार्य या संस्थेने केले आहे. 7 राज्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निवडक 15 महिलांना प्रेमाताई गोपालन सखी सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सारिका पवार यांना महिला सक्षमीकरण ग्रामविकास उद्योग व्यवसाय, नेतृत्व आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे सखी प्रेरणा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वयं शिक्षण प्रयोग
यावेळेस सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील सारिका पवार यांना उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी, प्रा. विनोद मेनन यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व रोख दहा हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचे अध्यक्ष प्रा. विनोद बेजन यांनी स्वागत केले. व पुरस्कार मिळालेल्या सर्व महिलांचे अभिनंदन केले व त्यांचे काम वाखाण्याजोगे आहे व प्रेमाताई गोपालन यांनी दिलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला असे त्यांनी सांगितले.
शिक्षण प्रयोग संस्थेचे – उपमन्यू पाटील, प्रोग्रॅम मॅनेजर – तबसुम, सोलापूर जिल्हा समन्वयक बाळासाहेब काळदाते, दक्षिण सोलापूर तालुका समन्वयक विजय पटणे यांनी सारिका पवार यांचे अभिनंदन केले.