MAHAPEX – 2025 : टीम रायगड एक्सप्रेस च्या ई-सायकल रॅली चे पंढरपूर डाक विभाग कडून जंगी स्वागत

पंढरपूर, दि.18 : दिनांक 22 जानेवारी 2025 ते 25 जानेवारी 2025 या कालावधी मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर ,मुंबई येथे होणाऱ्या MAHAPEX -2025 (डाक तिकिटांचे प्रदर्शन) अंतर्गत जनजागृती साठी छत्रपती संभाजीनगर येथून दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी निघालेली ई-सायकल रॅली पंढरपूर मध्ये सोलापूरहुन दाखल झाली. या ई सायकल रॅली चे पंढरपूर डाक विभागाचे डाक अधीक्षक चंदक्रांत भोर, सहा. अधीक्षक श्री. एम. एम. पाटील, यांच्या मार्गदर्शानुसार मुख्य सहा. अधीक्षक (प्रवास) धाराशिव विभाग श्रीकांत माने आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे विठुरायाच्या पावन नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात स्वागत करण्यात आले.

यावेळी या ई- सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या टीमचा व पंढरपूर मधील डाक तिकिटांचे संग्राहक डॉ. श्रीधर यलमार यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. श्री. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंढरपूर येथील द.ह. कवठेकर प्रशाला येथे रॅलीतील टीम रायगड एक्सप्रेस टीम प्रमुख श्रीकांत माने साहेब यांनी पोस्ट ऑफिस च्या तिकीट जमा / गोळा करण्याच्या छंदाबाबत, ढाई आखार पत्र लेखन स्पर्धेबाबत शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांना माहिती दिली. तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सायकल वापराचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यानंतर बाल विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी यांच्या सह नामदेव पायरी येथे ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापेक्स २०२५ च्या ध्वजाचे अनावरण भजन, कीर्तन आणि टाळ, मृदूंग, वीणा यांच्या निनादामध्ये पंढरपूर विभागातील कमर्चारी बंधू भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.

या प्रसंगी पंढरपूर डाक विभागाचे डाक अधीक्षक चंदक्रांत भोर, सहा. अधीक्षक एम. एम. पाटील, ज्ञानेश्वर देशमुख महाराज जळगावकर, उपाध्यक्ष विठठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर, पंढरपूर हेड पोस्ट ऑफीस चे पोस्टमास्तर सोमनाथ गायकवाड आणि पंढरपूर विभागातील कमर्चारी बंधू भगिनी यांनी रॅली च्या बारामती – सासवड- पुणे – महाड – रायगड मार्गे गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या मार्गक्रमणासाठी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here