टेभूर्णी, दि.१४ : क्रीडा व युवक सेना संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुलात दि.१२ जानेवारी ते १४ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व केलेल्या टेंभुर्णी (ता.माढा) येथील जय तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा नाशिक विभागाचा पराभव करून राज्यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा संघाने शालेय शूटिंग बॉल स्पर्धेच्या १९ वर्षाखालील गटामध्ये पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळविला होता.आणि पुणे विभागाकडून खेळण्यासाठी यवतमाळ येथे राज्यस्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धेतही अमरावती व छत्रपती संभाजी नगर विभागास पराभूत करून प्रथम क्रमांक पटकावून फायनलमध्ये नाशिक विभागाबरोबर सामना झाला.सदर सामान्यामध्ये खेळून पहिला डाव २१-१८ व दुसरा डाव २१-१२ अशा चुरशीच्या लढ्यात संघाचा कर्णधार ऋतुराज रोहिदास वाघमारे यांने उत्कृष्ट कामगिरी करून नाशिक विभागाचा पराभव करून राज्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळविला व संघाचे सर्व खेळाडू पुणे विभागाकडून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यास पात्र ठरले.या विजेत्या संघास यवतमाळचे क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांच्याहस्ते पुरस्कार व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
यशस्वी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक प्रा.संतोष शिंदे व रेणुकादास वाळके, महादेव चौगुले यांचे इतर मागास व बहुजन कल्याण विभाग सोलापूरच्या संचालिका मनीषा फुले, जिल्हा क्रीडा अधिकारी तानाजी मोरे , रेल्वे विभागाचे निरंजन मोरे, नांदेडचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे,श्री.शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णीचे संस्थापक कैलास सातपुते,अध्यक्ष श्री प्रशांत साळे,व महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री गवळी , प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका संतोषी आगावणे , प्रा.शुभम सातपुते तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.