धाराशिव, दि.१४ : स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या वतीने आज धाराशिव येथे राज्यस्तरीय आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा धाराशिव येथील नामवंत भोसले हायस्कूलचे संस्थापक सुधीर अण्णा पाटील, ॲड तुकारामजी शिंदे प्रदेशाध्यक्ष कुणबी मराठा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष,सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई प्रा डॉ बापूसाहेब आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली खाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रा गंगाधर पडनुरे, प्रदेश सचिव,मारुती खरात प्रदेश कार्याध्यक्ष, प्रा. देविदास जगताप प्रदेश उपाध्यक्ष, डॉ. शिवाजीराव होनकडे प्रदेश उपाध्यक्ष, डॉ दत्तात्रय काळेल,प्रदेश कार्याध्यक्ष,संजयकुमार घोडके प्रदेश प्रवक्ते, गणेश नावडे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख, डॉ भाग्यश्री राठोड महिला जिल्हाध्यक्ष सोलापूर, मीनाक्षी जाधव सचिव, स्वाती खरवले सोलापूर शहराध्यक्ष, रमेश लोखंडे उपाध्यक्ष सदसंकल्प शिक्षण समाजसेवा संस्था सोलापूर, ज्ञानदीप शिक्षण समूहाचे व्यवस्थापक वाहिद सय्यद या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रसंगी ३० शिक्षक, २० मुख्याध्यापक, १५ शाळा यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले राज्यभरामधून सांगली सातारा कोल्हापूर पुणे यवतमाळ,सोलापूर, नागपूर जळगाव श्रीगोंदा, हिंगोली इत्यादी भागांमधून मोठ्या उत्साहामध्ये पुरस्काराचे सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश नावडे संपर्कप्रमुख धाराशिव जिल्हा यांनी केले सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे, यांनी केले तर सर्वांचे आभार प्रदेश कार्याध्यक्ष मारुती खरात यांनी मानले.









