छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा महानिबंध स्पर्धेतून जागर

महामानव घरोघरी अभियानांतर्गत महानिबंध स्पर्धेत सहभागी व्हा अन जिंका पाच लाखाचे प्रथम तर तीन लाखाचे द्वितीय क्रमांकाचे महाबक्षीस

कोल्हापूर, दि.19: निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्यावतीने महामानव घरोघरी अभियानांतर्गत आपल्या सर्वांचे आदर्श, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी मराठी भाषेतील सर्वात मोठ्या भव्य महानिबंध महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या निबंध स्पर्धेचा सर्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराज : जीवन, कार्य आणि विचार असा विषय आहे.

या भव्य महानिबंध महास्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे महाबक्षीस पाच लाख रुपयांचे असून यामध्ये एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके मिळणार आहेत. द्वितीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस तीन लाख रुपयांचे असून यामध्ये पन्नास हजार रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके मिळणार आहेत. त्याचबरोबर वीस बक्षीसे उत्तेजनार्थ असून प्रत्येकी दहा हजार ज्यामध्ये एक हजार रुपये रोख आणि नऊ हजारांची पुस्तके मिळणार आहेत.
या भव्य महानिबंध महास्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येकास दोन हजार रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्रही मिळणार आहे.
या भव्य महानिबंध महास्पर्धेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या फक्त पाचशे स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार असून प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 30 मार्च, 2024 आहे तर निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल, 2024 असून या स्पर्धेचा निकाल 30 मे, 2024 सायंकाळी 6:00 वा. जाहीर केला जाणार असून बक्षीस वितरण 26 जून, 2024 रोजी करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क
1,000/- (एक हजार) रुपये असून आपण 1,000/- (एक हजार) रुपयांचे
प्रवेश शुल्क भरून आपला
प्रवेश निश्चित केल्यास त्वरित
2,000/- (दोन हजार) रुपयांची
पुस्तके मोफत घरपोच पाठवली जातील.
————————
स्पर्धेसाठी नियम व अटी लागू असून सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.
1. स्पर्धकांना कोणतीही वयोमर्यादा, प्रदेश आणि जाती-धर्माचे बंधन नाही.
2. निबंध मराठी भाषेत आणि 4 ते 5 हजार शब्द मर्यादित असावा.
3. सर्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराज जीवन, कार्य आणि विचार या विषयाच्या अनुषंगाने विविध पैलूंवरील स्वलिखित (अक्षर चांगले असेल तर) किंवा टाईप करुन (श्रीलिपी, युनीकोड, कृती-50) निबंध nirmitifilmclub@gmail.com या ईमेलवर (PDF व OPEN फाईल) पाठवावा. तसेच एक कॉपी समक्ष भेटून द्यावी किंवा पोस्टाने खात्रीपूर्वक पोहोचेल अशी 30 एप्रिल, 2024 पर्यंत पाठवणे बंधनकारक.
4. प्राप्त निबंधामधील निवडक निबंध ISBN क्रमांक असलेल्या संपादित ग्रंथात स्पर्धाकांच्या नावासह प्रकाशित केले जातील.
5. स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी 30 मार्च, 2024
पर्यंत 1,000/- रु. भरुन करणे बंधनकारक राहील.
6. बक्षिसांची रक्कम चेकनेच दिली जाईल.
7. निकाल लागल्यापासून पुढील 5 दिवस स्पर्धकांना निर्मिती फिल्म क्लबच्या कार्यालयात स्वतः चा निबंध पाहण्यास उपलब्ध असेल.
8. स्पर्धकांनी आपले प्रवेश शुल्क भरण्यासाठी 9420361122 या फोन/गुगल पे नंबरचा किंवा
निर्मिती फिल्म क्लब (IDBI बँक) करंट खाते क्रमांक
0464102000022622
IFSC Code : IBKL0000464
शाहूपुरी शाखा, कोल्हापूर या खाते क्रमांकाचा वापर करावा.
9. स्पर्धकांनी प्रवेश शुल्क भरून झाल्यावर दि. 30 मार्च, 2024 पर्यंत स्पर्धकाचे संपूर्ण नाव, सविस्तर पत्ता, व्हाट्सएपचा संपर्क नंबर, शिक्षण व वय 9420361122 या व्हाट्सएप नंबरवर खात्रीपूर्वक पोहोचेल असा पाठवावा.
10. दि. 30 एप्रिल, 2024 पर्यंत निर्मिती फिल्म क्लब च्या कार्यालयात पोहोचणारा निबंधच स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाईल.
11. स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र रजिस्टर पोस्टाने पाठवले जाईल किंवा ऑफिसमध्येही उपलब्ध असल्याने स्वतः लाही घेऊन जाता येतील.
12. स्पर्धकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास स्पर्धकास स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
13. परिस्थितीजन्य काही बदल झाल्यास ते आपणास कळविण्यात येतील.
14. कायदेशीर बाब कोल्हापूर न्याय कक्षेत.

अधिक माहितीसाठी 9420361122 या व्हाट्सअँपच्या नंबरवर निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती पाठवा असा मेसेज पाठवावा किंवा मुख्य आयोजक, निर्मिती फिल्म क्लब, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर, 873, क/2, सी वॉर्ड,सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर-416002 या ठिकाणी प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here