वा, खूपच छान ; विठाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था व अभिनव विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास अभूतपूर्व प्रतिसाद

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य

पंढरपूर, दि.१३ : विठाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था व अभिनव विवेकानंद प्रतिष्ठान पंढरपूरच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने योग भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरामध्ये उस्फूर्तपणे रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कृष्णा गोदावरी खत कंपनीचे संचालक संदीप नलंदवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अधिकाधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रवींद्र भिंगे, रवींद्र लव्हेकर, शहाजी देशमुख, मंदार केसकर, शशिकांत दुनाखे, श्रीकांत मेलगे आदी रक्तदात्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी कलाशिक्षक भारत गदगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या रक्तदान शिबिरास माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील व युवा नेते प्रणव परिचारक, स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बी.पी.रोंगे, माजी नगरसेवक विशाल मलपे, डॉ. प्रसाद खाडिलकर, डॉ.संभाजी पाचकवडे, डॉ. सागर गायकवाड, पत्रकार मित्र पोलीस संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंढरपूर शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट दिली.

या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी विठाई संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, सचिव- रवी ओव्हाळ, डॉ.सचिन लादे, प्रताप चव्हाण, राम मोरे, प्रसाद कोत्तुर, सुनील जगताप, संजय कुलकर्णी, संजय टोणपे, मंदार केसकर, डॉ.आनंद भिंगे, ओंकार कापसे, अनिल घाडगे, प्रा.शशिकांत घाडगे, कविता गायकवाड, महानंदा डोंबाळे, ज्योतिर्लिंग गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. तर या शिबिराचे रक्त संकलन पंढरपूर ब्लड सेंटर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here