दोन वर्षांपूर्वी पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था बाळे सोलापूर या पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया झाली व आख्खा पॅनल भरघोस मतांनी निवडूनही आला. याचे कारण म्हणजे स्वच्छ चारित्र्य, कार्यकुशलता, निर्णयक्षमता, अहोरात्र कष्ट, संवेदनशील, तत्परता, शैक्षणिक प्रश्नांची जाण, भ्रष्टाचाराचा डाग नसलेले आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आमदार दत्तात्रय सावंत सर आमच्याबरोबर असल्यामुळे सर्व मतदारांनी विश्वास ठेऊन निवडून दिले. गेल्या दोन वर्षांत बऱ्याच घडामोडी झाल्या. बरीच चांगली कामेही चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाने सरांच्या मार्गदर्शनाखाली केली. 100 कोटींची उलाढाल असलेली शिक्षक पतसंस्था म्हणून ओळख निर्माण झाली.
1. शिक्षण -सेवा-सहकार या तत्त्वावर काम करणारी आपली पतसंस्था.
2. कर्ज मर्यादा 12 लाख तर व्याज दर 8 टक्के आजतागायत कायम. तसेच तातडीने तातडी मंजूर करण्यात येते. (तातडी 80 हजार केली)
3. वर्षातून दोन वेळा व्याज व एक वेळा डिव्हिडंड सभासद खात्यावर जमा केले जाते.
3. संजिवनी ठेवीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत 2 कोटी 30 लाख रूपये सभासद वारसांना दिले.
4. गेल्या वर्षी 1 कोटी 59 लाख तर या वर्षी 2 कोटी 2 लाख नफा झाला. त्यामुळे 11 टक्केने सभासदांना डिव्हिडंट देऊ शकलो.
5. कर्मचारी कपात केली कारण पगारावरावरती जास्त रक्कम खर्च होत होती.. (ही रक्कम नफ्यातून जात होती)
6. जिवंत शिल्प निर्माण करणाऱ्या शिक्षकांना व सेवकांना आदर्श पुरस्कार चालू केले.
7. कागद विरहित करून संगणकीकरण पतसंस्था निर्माण केली.
8. पतसंस्थेच्या इमारत रंगरंगोटी करून वाॅलकंम्पाऊंड केले.
9. पतसंस्थेच्या मालकीच्या 15 गुंठे असलेल्या जागेस वाॅलकंम्पाऊंड केले.
10. पतसंस्था राज्यस्तरीय केली. कार्यक्षेत्र वाढवले.
11. लवकरच पंढरपूर, बार्शी, पुणे आणि मुंबईमध्ये पतसंस्थेच्या शाखा.
12. सभासद पाल्याच्या लग्न कार्यासाठी आर्थिक मदत म्हणून शुभमंगल योजनेस मंजुरी
13. लवकरच सभासद मागणीप्रमाणे जास्त कर्ज मिळेल.
14. स्वतंत्र ॲप व बारकोड वरती पतसंस्थेची माहिती उपलब्ध.
15. संचालकास कोणत्याही प्रकारचा भत्ता किंवा प्रवास खर्च नाही.
16. मोठ्या प्रमाणात थकीत कर्ज वसूल केले.
17. सतत लेखापरीक्षण अहवालात ऑडिट वर्ग “अ”
हे सर्व आम्ही करू शकलो कारण सभासदांचा विश्वास आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत सरांचा पाठीवरचा हात जे काही करायचे आहे ते प्रामाणिक व सभासदांच्या हितासाठी करा असे प्रत्येकवेळी सरांचे शब्द खरेच चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाने पाळले व यापुढेही असेच काम करण्याची ग्वाही आम्ही देत आहोत.
– श्री.राजेंद्र हरिभाऊ माळी सर
चेअरमन
सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्या. बाळे, सोलापूर.