पंढरपूर, दि.११ : पंढरपूर येथे विठाई बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक संस्था व अभिनव विवेकानंद प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व रक्तदात्यांचा सन्मान समारंभाचे आयोजन रविवार दि.१२ रोजी करण्यात आले आहे.
योगभवन एलआयसी कार्यालयाच्या पाठीमागे, भक्तीमार्ग पंढरपूर येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे. रक्तदान केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात त्यामुळे समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्तदान करावे अशी विनंती संयोजकाकडून करण्यात आलेली आहे. यावेळी आजपर्यंत अनेक वेळा रक्तदान करून सामाजिक भान जोपासणाऱ्या काही रक्तदात्यांचाही सन्मान या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
रक्तदान शिबिर व रक्तदात्यांचा सन्मान समारंभ यशस्वी करण्यासाठी सोमनाथ गायकवाड, डॉ. सचिन लादे, राम मोरे, रवि ओहोळ, प्रताप चव्हाण, डॉ.आनंद भिंगे, मंदार केसकर, अनिल घाडगे, डॉ.स्वानंद कुलकर्णी, शशिकांत घाडगे, डॉ. प्रविदत्त वांगीकर, उदयसिंह वाघमारे, सुनील कोरे, डॉ. मैत्रेयी केसकर, किर्ती मोरे, अर्चना वाघमारे, महानंदा डोंबाळे, कविता गायकवाड, प्रसाद कोत्तुर, संजय टोणपे, नागेश निंबाळकर, ज्योतिर्लिंग गायकवाड व संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.