अभिनंदन ! सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र माळी यांची निवड 

व्हाईस चेअरमनपदी विद्या पाटील : माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्याकडून नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार

सोलापूर, दि.11 : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित बाळे या पतसंस्थेच्या चेअरमनपदी मंगळवेढा येथील राजेंद्र हरिभाऊ माळी यांची तर व्हाईस चेअरमनपदी अक्कलकोट येथील विद्या गुरुप्रसाद पाटील यांची निवड करण्यात आली.

माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या रीतीने सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था सुरू आहे. आज झालेल्या बैठकीत चेअरमनपदी राजेंद्र हरिभाऊ माळी व व्हाईस चेअरमनपदी विद्या गुरुप्रसाद पाटील यांची एक मताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. ए.ए. गावडे यांनी काम पाहिले. निवडणूक निर्णय प्रक्रिया पार पडल्यानंतर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी चेअरमन सुरेश गुंड, माजी व्हाईस चेअरमन सुप्रिया पांगळ, संचालक समाधान घाडगे, शिवाजी शिंदे, दत्तात्रय कदम तात्यासाहेब काटकर, मारुती गायकवाड, संभाजी चव्हाण, शिवाजी थिटे, कैलास देशमुख, सुभाष भिमणवरु, नवनाथ मोहोळकर, जवानसिंग रजपूत, नामदेव आलदर, शंकर वडणे, सचिव चंद्रकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

चेअरमनपदी राजेंद्र माळी व व्हाईस चेअरमनपदी विद्या पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रातील क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here