श्रीकांत मेलगे, ब्युरो चीफ झेप संवाद न्यूज
मंगळवेढा, दि.11 : बालाजीनगर (ता.मंगळवेढा) येथील प्राथमिक/ माध्यमिक आश्रम प्रशाला, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथील शैक्षणिक सहल श्री स्वामी समर्थ दत्त मंदिर येथे घेऊन जाण्यात आली होती यावेळी आश्रम शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्री स्वामी समर्थ दत्त मंदिर येथे वृक्षारोपण करीत सामाजिक बांधिलकीचा संदेश सर्वांसमोर ठेवला आहे.
सध्या शाळांच्या शैक्षणिक सहली आपल्या राज्यातील विविध धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळे या ठिकाणी काढल्या जातात. या सहलीतून मौज-मस्ती करत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगणित होतो. सहलीप्रसंगी काही वेळेला अडचणींना सुद्धा सामोरे जावे लागते, तर काही वेळा अपघाती प्रसंगही घडून येतात. सहल म्हटले की विद्यार्थ्यांना खर्च आला या सहलीसाठी काही पालकांना आपली परिस्थिती नसतानाही केवळ मुलाच्या इच्छेखातर पैशाची जमवा-जमव करून आर्थिक ओढाताण सहन करत आपल्या पाल्याला सहलीसाठी पैसे दिले जातात. तसेच जणांना सहलीत किंवा सहलीवरून आल्यानंतर आजारपणालाही सामोरे जावे लागते ते वेगळेच.
विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झालाच पाहिजे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीही जोपासली पाहिजे या भावनेतून सहल खर्च व संभावित अडचणी यांना फाटा देऊन बालाजीनगर आश्रमशाळेची एक दिवसीय सहल श्री स्वामी समर्थ दत्त मंदिर येथे घेऊन जाण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी मिष्टान्न भोजनाबरोबरच धार्मिक वातावरात आनंद घेतला. श्री बालाजी शिक्षण संकुलात सध्या हजारो झाडांचे संगोपन केले जात असताना आश्रमशाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी मंदिर परिसरात वृक्षारोपण करून एक वेगळा सामाजिक बांधिलकीचा संदेश सर्वांसमोर ठेवला आहे. सहल म्हणजे केवळ मौज मस्ती नाहीतर सहली प्रसंगी सामाजिक बांधिलकीही जोपासण्यासाठी सर्वांनीच पुढे येणे आवश्यक आहे.
शैक्षणिक सहलीप्रसंगी मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश दिल्याबद्दल श्री बालाजी शिक्षण संकुलाच्या अध्यक्ष तुळसाबाई लालसिंग रजपूत, मार्गदर्शक उत्तमसिंग रजपूत, अमरसिंह रजपूत, उपाध्यक्ष प्रा.शिवलाल जाधव, सचिव राहुल रजपूत, प्राचार्य गणपती पवार, पर्यवेक्षक कुंडलिक पवार यांनी आश्रम प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
दातृत्वाला सलाम…
बालाजीनगर आश्रम शाळेच्या सहलीप्रसंगी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. हे मिष्टान्न भोजन श्री स्वामी समर्थ दत्त मंदिराच्या यशोदा माता, प्राथमिक आश्रमशाळेतील सहशिक्षक संतोष गायकवाड, संजीव बाबर, विनोद तांबे यांनी देत आपले दातृत्व दाखवून दिले.