मालवण, दि.10 : श्री. संत दामाजी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख – डॉ. नवनाथ रघुनाथ जगताप यांच्या ” हिंदी साहित्य का इतिहास – एक विवेचन ” या दुसऱ्या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाच्या – कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित , स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय , मालवण येथे महाराष्टू हिंदी परिषदेच्या 31 व्या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदी विद्वानांच्या उपस्थितित मोठ्या दिमाखामध्ये करण्यात आले.
यामुळे मंगळवेढ्यातील साहित्यिक व कवींच्या कळपामध्ये डॉ. नवनाथ जगताप यांच्या नावाचा समावेश झालेला दिसतो . या प्रकाशन सोहळ्यामध्ये प्रो. डॉ. जिजाबराव पाटील – अध्यक्ष – महाराष्ट्र हिंदी परिषद , सचिव – डॉ. गजानन चव्हाण , प्रो. पांडूरंग पाटील – पूर्व हिंदी विभागाध्यक्ष – कोल्हापूर , डॉ. मधुकर खराटे – पूर्व अध्यक्ष – महाराष्ट्र हिंदी परिषद , डॉ. शिवराम ठाकूर – प्राचार्य – मालवण , डॉ. सतीश पांडे – डीन सोमय्या महाविद्यालय मुंबई , डॉ. अनिल काले – हिंदी विभागाध्यक्ष – नारायणगाव , डॉ. पंढरीनाथ पाटील शिवांश – उपाध्यक्ष विश्व हिंदी संघटन – नई दिल्ली , डॉ. विठ्ठलसिंह ढाकरे – लासलगाव , डॉ. अनिल साळुंखे – करमाळा , डॉ. अशोक साळुंखे – मंडनगड , डॉ. विद्या शिंदे – खेड – रत्नागिरी , डॉ. दत्तात्रय मुरूमकर – हिंदी विभागाध्यक्ष – मुंबई विद्यापीठ . – मुंबई , डॉ. सुनील बनसोडे – बारामती, डॉ. बाबासाहेब कोकाटे – बीड , डॉ. वसंत नंदगिरीकर – वेंगुर्ला, डॉ. भाऊसाहेब नवले – सात्रल , डॉ. सुनिल चव्हाण – लांजा , डॉ. संतोष रायबोले – फोंडा , डॉ. इम्रान शेख – मंगळवेढा , डॉ. बळवंत सर – पंढरपूर , डॉ. चंद्रदेव कवडे – औरंगाबाद , डॉ. साताप्पा सावंत – सांगली , डॉ. अरुण घोगरे – परतवाडा , डॉ. देविदास बामणे – पेण , डॉ. सुरेश शेळके – औंढा नागनाथ , इत्यादी हिंदी चे दिग्गज मान्यवर उपस्थित होते
डॉ. नवनाथ जगताप यांच्या या ग्रंथासाठी शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूरचे माजी हिंदीविभागप्रमुख ,महाराष्ट्रातील हिंदी साहित्याचे भीष्माचार्य , व ख्यातनाम अनुवादक , गजलकार डॉ. अर्जुन चव्हाणजी ने एक पान भूमिका लिहून गौरवान्वित केलेले आहे . त्यामुळे या ग्रंथाला अधिक महत्व प्राप्त झालेले दिसून येते . तशेच सहकारी डॉ. अनिल कांबळे यांचे विशेष योगदान मिळाले .
या ग्रंथ प्रकाशना बद्दल श्री विघा विकासमंडळडाचे सर्व पदाधिकारी , प्राचार्य – डॉ. औदुंबर जाधव , महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील कर्मचारी , विद्यार्थी व मंगळवेढ्यातील हिंदी प्रेमिंनी कौतुक करून पुढील साहित्यिक कामासाठी शुभेच्छा दिल्या . डॉ. नवनाथ जगताप यांनी हा ग्रंथ त्यांचे वडील स्व. रघुनाथ जगताप यांच्या स्मरणार्थ प्रकाशीत करून त्यांना समर्पित केला आहे.