प्रलंबित प्रश्नाबाबत मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली गटशिक्षणाधिकारी डॉ. रणदिवे यांची भेट

मंगळवेढा, दि.०९ : मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न व मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी डॉ. बिबीशन रणदिवे यांचेसोबत मंगळवेढा तालुका शिक्षक संघाची शिष्टमंडळ बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिक्षक संघाचे निवेदन देवून २४ मागण्या करण्यात आल्या व त्यातील प्रत्येक मुद्द्यांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली तसेच प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कालमर्यादा ठरविण्यात आली. 

सदर बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस राजेंद्र केदार यांनी केले. नूतन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देवून प्रलंबित प्रश्न सोडविण्याची विनंती केली. शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष संभाजी तानगावडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील गुणवत्ता चांगली असून शिक्षकांचे प्रश्न सोडवून त्यांना कार्यालयात हेलपाटे न लावता त्वरित कामे पूर्ण करून शिक्षकांना आनंदी ठेवावे जेणेकरून ते उत्साहाने शैक्षणिक कामकाज करतील असे सांगून शिक्षक काही कामानिमित्त कार्यालयात आल्यावर त्यांच्या अर्जाची पोहोच द्यावी व सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांच्या कामाची माहिती संबंधित लेखनिक यांनी द्यावी अशी मागणी केली. शिक्षक संघाच्या विनंती वरून शिष्टमंडळ बैठक आयोजित केल्याबद्दल धन्यवाद दिले. शिक्षक संघाच्या निवेदनातील २४ मागण्या क्रमाने मांडून त्याबाबत सद्यस्थिती व पुढील कार्यवाही बाबत सविस्तर चर्चा केली.

राज्य संघाचे नेते संजय चेळेकर यांनी निवेदनातील प्रश्न व मागण्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी असे सांगून विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यात विविध उपक्रमास शिक्षक संघ गटशिक्षणाधिकारी कार्यालयास सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. नवीन वर्षाच्या सुरूवातीस शिष्टमंडळ बैठक आयोजित केल्याबद्दल धन्यवाद देवून शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवून नवीन वर्षाची भेट द्यावी अशी मागणी केली. गटशिक्षणाधिकारी डॉ.बिभिषण रणदिवे यांनी बोलताना सांगितले की, शिक्षक संघाने अतिशय योग्य प्रश्न मांडलेले आहेत. मी स्वतः शिक्षक म्हणून काम केलेले असून निश्चितच आपल्या मागण्याबाबत सकारात्मक असून वेळत प्रश्न पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. निवेदनातील प्रश्न व मागण्या अतिशय योग्य असून सदर निवेदनातील तालुकास्तरीय प्रश्न लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील आणि निवेदनातील मागण्यानुसार कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.

बैठकीस उपस्थित शिक्षक संघाचे पदाधिकारी यांचे स्वागत विस्तार अधिकारी पुरुषोत्तम राठोड यांनी केले. वरिष्ठ लेखनिक संतोष मोरे यांचेकडून बैठकीचे प्रोसिडींग करण्यात आले. सदर बैठकीस प्रभारी विस्तार अधिकारी पुरूषोत्तम राठोड व शामराव सरगर, कार्यालयीन लेखनिक माणिक पाटील व संतोष मोरे व तालुका शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष कविराज दत्तू, कार्याध्यक्ष नागेशकुमार धनवे, कोषाध्यक्ष सखाराम सावंत, प्रवक्ते सिध्देश्वर मेटकरी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवास माळी, तालुका प्रसिध्दी प्रमुख भीमाशंकर तोडकरी, उपाध्यक्ष गोपाळ लेंडवे तसेच तालुका शिक्षक संघ कार्यकारणी मधील राजशेखर कोष्टी, राजू रायबान, मुक्तार पटेल, बंडोपंत गायकवाड, राजाराम देवकते, मोहनराव लेंडवे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here