बालाजीनगर, दि.०९ : बालाजीनगर (ता.मंगळवेढा) येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे अधीक्षक बिराप्पा बिसलाप्पा नरुटे यांना शिक्षक भरती संघटनेच्या वतीने सावित्री फातिमा गुणवंत अधिक्षक पुरस्कार सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सोलापूर येथील जगदीश श्री लॉन्स अँड हॉल येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात कर्म निष्ठा व आत्मीय सेवेची पोहच म्हणून अधीक्षक बिराप्पा नरूटे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, फेटा देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोक बेलचरे, खाजगी प्राथमिक माध्यमिक शिक्षक भारती संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, देवदत्त मेटकरी, विकास धसाडे, रुपाली कुरुमकर, श्री बालाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष उत्तमसिंग रजपूत, बालाजीनगर आश्रमशाळेचे प्राचार्य गणपती पवार, मुख्याध्यापक विलास पवार, पर्यवेक्षक कुंडलिक पवार, अधीक्षक सुरेश पवार, शंकर चव्हाण, दत्तात्रय मासाळ, डॉ.भगवान चोपडे, सिद्धनाथ सलगर, प्रा.बाळासाहेब नरुटे, ग्रामपंचायत सदस्य जकराया नरूटे, श्रीकांत चव्हाण, भारत राठोड, पोपट संगोलकर, बिराप्पा सलगर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त अधीक्षक बिराप्पा नरुटे हे गेल्या 26 वर्षापासून अधीक्षक पदावर कार्यरत असून एक विद्यार्थी प्रिय अधीक्षक, शिस्तप्रिय, जबाबदारीने काम करणारे कर्मचारी म्हणून त्यांचा श्री बालाजी शिक्षण मंडळात नाव लौकिक आहे.
बिराप्पा नरुटे यांना शिक्षक भरती संघटनेच्या वतीने सावित्री फातिमा गुणवंत अधिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री बालाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तुळसाबाई लालसिंग रजपूत, मार्गदर्शक अमरसिंह रजपूत, उपाध्यक्ष प्रा.शिवलाल जाधव, संचालक पोमसिंग रजपूत, दामाजी शुगरचे माजी संचालक विजय माने, सेवानिवृत्ती शिक्षक प्रा.बापुराया शिंदे, महादेव राठोड, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषा राजगुरू, लक्ष्मीबाई काळे, तेजिराम मदने, आक्काताई श्रीराम,तसेच श्री बालाजी शिक्षण संकुलतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.












