मंद्रूप, दि.६ : दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सहाव्यांदा दैनिक संचारचे पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपाध्यक्ष पदी दैनिक सुराज्य पत्रकार बालाजी वाघे, दैनिक सकाळचे महासिद्ध साळवे तर सचिवपदी दैनिक लोकमतचे नितीन वारे तर कार्याध्यक्षपदी दैनिक जनमतचे शिवराज मुगळे यांची निवड करण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे वार्षिक सर्वसाधारण सभा मंद्रूप येथे दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बैठकीमध्ये सर्वांनीच पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांचे कार्य कौतुकास्पद असून पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सहाव्यांदा त्यांचीच फेरनिवड निवड करावी अशी एकमुखी मागणी केली. यावेळी एकमताने पंचाक्षरी स्वामी यांची दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्षपदी सहाव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांचा सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी म्हणाले, भविष्यात पत्रकार संघासाठी कार्यालय आणि पत्रकार बांधवासाठी गृहनिर्माण संस्था, आरोग्य विमा योजना राबवणार असल्याचे सांगितले. आपली पुनश्च अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष- पंचाक्षरी स्वामी, उपाध्यक्ष- बालाजी वाघे व महासिद्ध साळवे, सचिव- नितीन वारे, सहसचिव- अप्पू देशमुख, कार्याध्यक्ष- शिवराज मुगळे, कोषाध्यक्ष- दिनकर नारायणकर, खजिनदार- समीर शेख, संघटक- अशोक सोनकंटले, प्रसिद्धी प्रमुख अभिजीत जवळकोटे व गिरमल्ल गुरव
सदस्य- महेश पवार, आनंद बिराजदार,प्रभू पुजारी,शिवय्या स्वामी,गजानन काळे, अल्ताफ शेख,बनसिद्ध देशमुख,आरिफ नदाफ, प्रमोद जवळकोटे,
सल्लागार – अमोगसिद्ध लांडगे,नारायण चव्हाण,बबलू शेख,
मार्गदर्शक- प्रशांत जोशी, अप्पासाहेब गंचिनगोटे,विजय देशपांडे,राजकुमार सारोळे,विनोद कामतकर,अप्पासाहेब हत्ताळे, विठ्ठल खेळगी, सचिन गाडेकर, गौतम गायकवाड