शिक्षक प्रश्नांची सोडवणूक करुन नववर्षाची भेट द्यावी ; सोलापूर जिल्हा शिक्षक समितीची मागणी

सोलापूर, दि.०४ : सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे वेतन अदा करताना प्रशासनाची तत्परता दिसून आली. ही बाब सुखावह असून याच गतीशीलतेने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करुन जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना नववर्षाची भेट द्यावी अशी मागणी सोलापूर जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली. शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील, मुख्य वित्त व लेखाधिकारी श्रीमती मिनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व आगामी काळात शिक्षकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत अशी मागणी केली.

यावेळी खाली नमूद प्रश्नांबाबत चर्चा झाली. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. यावेळी खाली नमूद प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.

1) रिक्त असलेली मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विस्ताराधिकारी पदे भरण्यासाठी पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात यावी.

2) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या उर्वरित तालुक्यातील शिक्षकांना मूळची जुनी पेन्शन लागू करण्यात यावी.

3) अधिसंंख्य पदावरील शिक्षकांना शासन निर्णयानुसार नियमित वेतनवाढ देण्याबाबतचे पत्र पंचायत समितीकडे निर्गत करण्यात यावे. संबंधित शिक्षकांना स्थायित्वाचा लाभ देवून फंडाची खाती सुरु करण्यात यावी.

4) सोलापूर जिल्ह्यातील अर्धवेळ शाळेची वेळ पूर्ववत करण्यासाठी ज्या शाळांनी प्रस्ताव सादर केले आहेत त्या प्रस्तावांना मंजुरी द्यावी.

5) भाषा व विज्ञान विषय शिक्षकांना सरसकट वेतश्रेणीचा लाभ मिळावा .

6) निवड श्रेणीच्या दीर्घकाळ रखडलेल्या प्रस्तावांना त्वरित चालना द्यावी.

7) पदवीधर शिक्षकांतून पदोन्नती घेतलेल्या शिक्षकांना वेतनवाढ द्यावी .

8) सेवापुस्तकातील नोंदी अद्ययावत करुन पुस्तक पडताळणीसाठी तालुका निहाय कॅम्प आयोजित करण्यात यावेत .

9)आंतरजिल्हा बदलून आलेल्या शिक्षकांची रक्कम मागणी करुन हिशोब पूर्ण करण्यात यावा.

10) ज्या शाळांतील पदे वर्षानुवर्षे समानीकरणात ठेवण्यात आलेली आहेत पदांबाबत फेरविचार व्हावा .

11) जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ द्यावा .

12) NPS अकाउंट मधील नावातील किरकोळ दुरुस्त्या मोबाईल नंबर व ई-मेल अपडेट करून दुरुस्ती करण्याबाबत विषय घ्यावा. गेल्या दीड वर्षापासून एन.पी.एस . दुरुस्ती करण्यात यावेत.

13) भ.नि.नि. प्रस्तावांना लागलेल्या त्रुटी व मंजूर झालेले प्रस्ताव यांची यादी वेळोवळी प्रसिद्ध करण्यात यावी.

14) सेवानिवृत्त शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतरचे सर्व आर्थिक लाभ वेळेत मिळावेत. तसेच सेवानिवृत्ती नंतरच्या दुसऱ्या महिन्यांपासून पेन्शन अदा करण्यात यावी.

15) भगिनी आर्थिक हिशोबाच्या स्लिप तत्काळ मिळाव्यात.

यावेळी राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, जिल्हा सरचिटणीस शरद रुपनवर, कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे, जिल्हा नेते संतोष हुमनाबादकर, संघटक गजानन लिगाडे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर बगाडे, राजन ढवण, मोहोळचे अध्यक्ष चरण शेळके, उम्मीद सय्यद, फिरोज मणेरी, दिपक काळे, शेखलाल शेख, सुनील ननवरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here