मंगळवेढा, दि.०२ : कै.रामगोंडा बापुराया चौगुले बहुउद्देशिय संस्था, सिध्दापूर संचलित,आर.बी.सी.इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज तांडोर-सिध्दापूर ता.मंगळवेढा, जि. सोलापुर आयोजित सिध्दापूर फेस्टीव्हल-२०२५ चा पत्रकारिता क्षेत्रातील जनमित्र आदर्श पत्रकार पुरस्कार प्रमोद बिनवडे यांना जाहीर झाला असल्याचे फेस्टिवलचे गजानन पाटील सर यांनी सांगितले.
हा पुरस्कार सोहळा सोमवार दि.१३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सिध्दापूर येथे होणार असून पंढरपूर – मंगळवेढ्याचे नुतन आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पत्रकार प्रमोद बिनवडे यांनी नेहमीच उपेक्षित व अन्यायग्रस्त वर्गासाठी आपली पत्रकारिता केली असून या सर्व गोष्टीची दखल म्हणून व पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून चांगले करत असताना त्यांना नवी दिल्ली येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोसिप पुरस्कार,मुंबई येथील लोकसेवा अकादमीच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार,मंगळवेढा येथून चालणाऱ्या दै.दामाजी न्युज चॅनलचा व साप्ताहिक मंगळवेढा दणकाचा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाले असुन आता सिद्धापूर फेस्टिवलचा आदर्श पत्रकार पुरस्कारही प्रमोद बिनवडे याना जाहीर करण्यात आला आहे.