शिक्षकांना निवडश्रेणी लागू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सकारात्मक पाऊल ; सोलापूर जिल्हा शिक्षक समितीने केले स्वागत

सोलापूर, दि. 29 : एकाच संवर्गातील चोवीस वर्षे अर्हताकारी सलग सेवेतनंतर पात्र शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्यात येते. मात्र सोलापूर जिल्ह्यात दीर्घकाळ रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करण्यात आली असून जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिक्षकांतून आनंद व्यक्त केला जात असून शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात 2001 – 02 पासून सन 2024- 25 या कालावधीत 24 वर्षे पूर्ण झालेल्या सेवेतील आणि सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. मात्र प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेला निवडश्रेणीचा हा प्रश्न शिक्षक समितीसह सर्व संघटनांच्या समन्वय समितीने ऐरणीवर घेतला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक जिल्हा परिषदेत 30 सप्टेंबर रोजी आयोजित केली होती. तीन तास चाललेल्या या बैठकीत मोठ्या प्रकर्षाने जिल्हा संघटना पदाधिकारी यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रही मागणी केली होती.

विधानसभा निवडणूक आचारसंहिता शिथील होताच या बैठकीत झालेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. निवडश्रेणीचा विषय मार्गी लावण्यासाठी दि. 28 नोव्हेंबर रोजी आदेश निर्गत करण्यात आला असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करण्यात आली असून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा यामध्ये समावेश आहे. शिवाय उपशिक्षणाधिकारी श्रीमती रुपाली भावसार यांच्यासह अन्य सात सदस्यांची प्रस्ताव संकलन व छाननीसाठी निवडश्रेणी मंजुरी समिती स्थापन करण्यात आली आहे .

या समितीकडून दर 15 दिवसांनी आढावा घेतला जाईल व वारंवार घेतल्या जाणाऱ्या बैठकीतून निवडश्रेणीचा विषय टप्प्याटप्प्याने मार्गी लागणार आहे. निवडश्रेणीच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नी जिल्हा परिषद प्रशासनाने अगदी पहिल्यांदाच सकारात्मक पाऊल टाकले आहे. जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचा रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेऊन या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी कार्यवाही सुरु केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, शिक्षणाधिकारी कादर शेख यांना सोलापूर जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांच्या वतीने शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेचे पदाधिकारी राजन सावंत, दयानंद कवडे, शरद रुपनवर , संतोष हुमनाबादकर, सुनील कोरे, रंगनाथ काकडे, प्रताप काळे, राजन ढवण, अमोगसिद्ध कोळी, अनिल बंडगर , मो.बा. शेख, बसवराज गुरव, अमोल राऊत, ज्योती कलुबर्मे, दिपाली बोराळे, दयानंद चव्हाण, अन्वर मकानदार, विठ्ठल ताटे, चरण शेळके, कैलास काशीद, शंकर अजगोंडे, अजिनाथ देवकते, रमेश खारे, भारत लवटे, रमेश सरक, संजय पाटील, शेखलाल शेख, मधुकर पाटील, किशोर बगाडे यांनी आभार मानले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here