महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे पुरस्कार जाहीर ; मंगळवेढा तालुक्यातील शाळा, मुख्याध्यापक व गुणीजनांचा होणार गौरव

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे तालुकाध्यक्ष विकास मोरे व सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक राजेंद्र हरिभाऊ माळी यांनी दिली माहिती

मंगळवेढा, दि.२९: पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत प्रणित महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे मंगळवेढा तालुक्यातील पुरस्कार जाहीर झालेले असून सदर पुरस्काराचे वितरण रविवार दि. १ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता सिंहगड कॉलेज, कोर्टी रोड पंढरपूर येथे वितरित होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती मंगळवेढा तालुकाध्यक्ष विकास मोरे व सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक राजेंद्र हरिभाऊ माळी यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील विविध शाळांनी शैक्षणिक उपक्रम राबवून आपल्या शाळेचा नावलौकिक प्राप्त केलेल्या शाळांना कृतिशील आदर्श शाळा, विविध शाळातील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांच्यामध्ये नाविन्यपूर्ण रीतीने व्यवस्थापन करून शाळा चांगल्या नावारुपाला आणल्या अशा मुख्याध्यापक/ प्राचार्यांना कृतिशील आदर्श मुख्याध्यापक / प्राचार्य पुरस्कार तसेच शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच शाळेचे प्रशासकीय कामकाज वेळच्यावेळी करून शाळेला प्रशासनामध्ये सहकार्य करणारे लिपिकांना कृतिशील आदर्श लिपिक व शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवून शाळांमध्ये प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचे काम करणाऱ्या सेवकांना आदर्श कृतिशील सेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

खालील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, लिपिक, शिक्षकेतर सेवक यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कृतिशील शाळा पुरस्कार : श्री महालिंगराया हायस्कूल हुलजंती, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, हुन्नूर, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल, मंगळवेढा, गणेश विद्यालय, गणेशवाडी

कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार : जयराम आलदर इंग्लिश स्कूल, भोसे, राजाराम दत्तू-माध्यमिक आश्रमशाळा येड्राव, अर्चना सलगर-ज्ञानदीप विद्यालय, मंगळवेढा, मदगोंडा माळी-माध्यमिक विद्यालय, शिवणगी

कृतिशील शिक्षक / शिक्षिका पुरस्कार : आण्णासाहेब घाडगे-श्री स्वामी विवेकानंद विद्यालय, गोणेवाडी, पांडूरंग लेंडवे-शरदचंद्र विद्यालय, मारापूर, उत्तम काळे-श्री कामसिद्ध विद्यालय, खुपसंगी, नागेश पाटील-श्री रेवणसिद्ध स्वामी विद्यालय, तळसंगी, सुवर्णा काळे-कै. बाबूराव जाधव विद्यालय, धर्मगाव.

कृतिशील कलाशिक्षक पुरस्कार : मनोज वेदपाठक श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर, माचणूर, संजय शिखरे नूतन प्रशाला बोराळे, प्रकाश पाटील-नूतन प्रशाला, मंगळवेढा

कृतिशील क्रीडाशिक्षक पुरस्कार : महादेव जावीर विद्यानिकेतन हायस्कूल, जालिहाळ, शिवशंकर स्वामी- जवाहरलाल प्रशाला, मंगळवेढा

कृतिशील सिनिअर कॉलेज प्राध्यापक पुरस्कार : डॉ. राजकुमार पवार-श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा

कृतिशील जुनिअर कॉलेज प्राध्यापक पुरस्कार : चंद्रकांत सदाशिव डांगे-शारदा सिद्धनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पाठखळ, बाळासाहेब बापू भोरकडे विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सलगर बु.

कृतिशील आयटीआय कॉलेज प्राध्यापक पुरस्कार: मारुती बिराप्पा निमंगरे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुंजेगाव

कृतिशील कृषी महाविद्यालय प्राध्यापक पुरस्कार : प्रशांत काकासो बाबर कवचाळे – कृषी महाविद्यालय, बोराळे

कृतिशील लिपिक पुरस्कार : विठ्ठल घोगरे-श्री सद्‌गुरु बागडे बाबा विद्यालय, बावची, श्रीकांत मेलगे-माध्यमिक आश्रमशाळा व जुनिअर कॉलेज, बालाजीनगर

कृतिशील सेवक पुरस्कार : प्रभाकर माने- कै. श्रीपतराव माने विद्यालय लवंगी, बापूराव गायकवाड-श्री विद्यामंदिर, शिरसी,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here