दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; या दिनांका पासून सुरु होणार दहावी व बारावीच्या परीक्षा

पुणे, दि. 21: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत. 

दहावी बोर्ड परीक्षेस शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी 2025 रोजी प्रारंभ होणार असून या परीक्षा सोमवार दिनांक 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहेत. दहावी परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाने होणार आहे.

आपण झेप संवाद न्यूज या न्यूज पोर्टलवर ही बातमी वाचत आहात.तर बारावीच्या परीक्षा मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरुवात होणार असून मंगळवार दि. 11 मार्च 2025 रोजी शेवटच्या विषयाची परीक्षा असणार आहे.

नेहमीपेक्षा यावर्षी लवकरच परीक्षा सुरुवात होणार असल्याचे या अगोदरच बोर्डाने सुचित केले होते त्यामुळे या वर्षाच्या दहावी व बारावी परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यास उत्सुकता होती. आता दहावी व बारावीचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले आहे. हे वेळापत्रक जाहीर करीत असताना बोर्डाने सूचित केले आहे की, दहावी व बारावी परीक्षेपूर्वी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांच्याकडे देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या वेळापत्रकावरून खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here