महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार ? महायुती की महाविकास आघाडी

सर्व एक्झिट पोल्सचे निकाल वाचा एका क्लिकवर

मुंबई, दि.20 : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी संपन्न झाली. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.22 टक्के मतदान झाले. ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (Exit Polls) निकाल जाहीर झाले आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत.

राज्यातील अन्य एक्झिट पोल्सचे निकाल खालीलप्रमाणे

1) इलेक्टोरल एज Exit Poll 2024

भाजप-78

काँग्रेस-60

शरद पवार गट-46

ठाकरे गट-44

शिंदे गट-26

अजित पवार गट-14

इतर-20

2) पोल डायरी Exit Poll 2024

महायुती – 122-186

भाजप – 77-108

शिवसेना (शिंदे गट) – 27-50

राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 18-28

महाविकास आघाडी – 69-121

काँग्रेस – 28-47

शिवसेना (ठाकरे गट) – 16-35

राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 25-39

इतर – 12-29

3) चाणक्य एक्झिट पोल Exit Poll 2024

महायुती 152 ते 160 जागा

भाजप-90

शिंदे गट- 48

अजित पवार गट-22

महाविकास आघाडी 130 ते 138 जागा

काँग्रेस-63

ठाकरे गट-35

शरद पवार गट-40

इतर- 6 ते 8

4) MATRIZE Exit Poll 2024

महायुती 150-170

मविआ 110-130

इतर 8-10

5) REPUBLICExit Poll 2024

महायुती 137-157

मविआ 126-146

अन्य 2-8

6) News 24 P-MARQ Exit Poll 2024

महायुती 137-157

मविआ 126-146

इतर 2-8

7) ZEE AI Exit Poll 2024

महायुती 114-139

मविआ 105-134

इतर 0.

8) लोकशाही रुद्र Exit Poll

महायुती – 128-142

भाजप – 80-85

शिवसेना (शिंदे गट) – 30-35

राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 18-22

महाविकास आघाडी – 125-140

काँग्रेस- 48-55

शिवसेना (ठाकरे गट) – 39-43

राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 38-42

इतर – 18-23

9) JVC Exit Poll 2024

महायुती 150-167

मविआ 107-125

इतर 13-14

10) Peoples Pulse Exit Poll 2024

महायुती 182

मविआ 97

इतर 9

11) SAS GROUP HYDRABAD Exit Poll 2024

महायुती 127-135

मविआ 147-155

इतर 10-13

विदर्भ (एकूण जागा 62)

मविआ 33-35

महायुती 26-27

इतर 2-3

पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा 70)

मविआ 40-42

महायुती 27-28

इतर 2-3

मराठवाडा (एकूण जागा 46)

मविआ 27-28

महायुती 17-18

इतर 2-3

मुंबई (एकूण जागा 36)

मविआ 18-19

महायुती 17-18

इतर 1-2

उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा 35)

मविआ 15-16

महायुती 18-21

इतर 2

कोकण (एकूण जागा 39)

मविआ 14-15

महायुती 22-23

इतर 1-2

चाणक्यच्या एक्झिट पोल्समध्ये महायुतीचा निसटत्या फरकाने विजय होण्याचा अंदाज

चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत महायुतीची सरशी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळेल. तर अपक्षांना 6 ते 8 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.

चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला 90 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर शिंदे गटाला 48 जागा आणि अजित पवार गटाला 22 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीसोबत असलेल्या सहयोगी उमेदवारांना 2 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस 63 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरेल. या निवडणुकीत ठाकरे गटाला 35 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकतो. तर 40 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी ठरतील. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना मिळून 6 ते 8 जागांवर विजय मिळण्याची अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here