पंढरपूर, दि.१७ : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ जिल्ह्याचे नेते प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहर येथे शेटे पेट्रोल पंप-ज्ञानेश्वर नगर-बोहरी पंप-भोसले चौक-संत कैकाडी महाराज मठ-श्री. भगवती देवी मंदिर-अनिल नगर-भुयाचा मारुती-काशीकापडी गल्ली-रामबाग १९७ब -सातारकर मठ-गोविंदपूर मठ-बाराभाई चौक-क्रांती चौक-जय भवानी चौक-हनुमान मैदान-भादुले चौक-नाथ चौक-गांधी रोड-चौफाळा या दरम्यान पदयात्रा व मतदारसंवाद फेरी संपन्न झाली.
या पदयात्रा प्रचार दौऱ्यात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मागील ३वर्षांत झालेल्या विकासकामांची दखल घेत नागरिकांनी भाजपा-महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार समाधान आवताडे यांना पुन्हा एकदा मतरुपी आशीर्वाद द्यावे असे आवाहन जिल्ह्याचे नेते प्रशांत परिचारक यांनी केले.
यावेळी मागील काळात केलेल्या कामांचा उल्लेख करत येत्या काळातील ध्येय-धोरणांविषयी नागरिकांशी संवाद साधत येत्या विधानसभा निवडणुकीत २० तारखेला मला मतदानरुपी आशीर्वाद देत माझ्या पाठीशी राहावे अशी नम्र विनंती केली शिवाय सदर पदयात्रेत जनतेने दिलेल्या प्रेमाने आणि पाठिंब्याने अभिभूत झालो आहे. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, हा शब्द देतो. आगामी काळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणखी जोमाने घडवून आणण्यासाठी पूर्ण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
सदरप्रसंगी युवक नेते प्रणव परिचारक यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.