मंगळवेढा, दि.१६ : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुका भटक्या जाती नाथपंथी-डवरी समाज संघ बंधू-भगिनींचा प्रबोधन संवाद मेळावा अखिल भारतीय भटक्या जाती संघ डवरी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली व कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा युवक नेते सोमनाथ आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये जोगेश्वरी मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे संपन्न झाला.
सदर मेळाव्यात भाजपा-महायुतीचे उमेदवार व मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाला ताकद देण्यासाठी सकल समाजाच्या वतीने आमदार समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा जाहीर करुन त्यांच्या मोठ्या विजयी मताधिक्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सामाजिक स्तरावरील कोणत्याही जाती-धर्माचा तसूभरही विचार मनात न ठेवता दादासाहेब यांनी मतदारसंघातील संपूर्ण डवरी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेळोवेळी समाजाच्या पाठीमागे आपली राजकीय व सामाजिक मोठी ताकद उभी केली आहे. येणाऱ्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला सर्वांगीण प्रगतीच्या शिखरावर पोहचवण्यासाठी आमदार आवताडे यांचे एकमेव आश्वासक नेतृत्व सर्वानुमते समाजाच्या पुढे उभे राहिल्याने आम्ही सर्वजण २३ तारखेच्या गुलालाचे भागीदार असणार असल्याची भावना राष्ट्रीय अध्यक्ष भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
आपल्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी सगळ्या देशाच्या कानकोपऱ्यात भटकंती करणाऱ्या या समाजाला सामाजिक व संघटीत स्थिरता प्राप्त होण्यासाठी त्यांच्या प्रत्येक मागणीचा संवेदनशील मार्गाने विचार करुन त्या पूर्ण करण्यासाठी आ समाधान आवताडे यांच्या माध्यमातून कटीबद्ध असल्याचा विश्वास माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी यावेळी दिला.
या मेळाव्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ, शिरनांदगी,रड्डे, गणेशवाडी आंधळगाव, शेलेवाडी, कचरेवाडी, हुन्नुर, मारोळी, लोणार, लवंगी, महमदबाद, जित्ती,खवे, जुनोनी, गोणेवाडी नंदेश्वर, रेवेवाडी, लोणार, खुपसंगी, मानेवाडी, खुपसंगी या गावातील समाज बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी भोसले, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, न. पा. प्राथमिक शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव, माजी उपसरपंच सुहास पवार, गणेशवाडी सरपंच सुभाष दादा इंगोले, तालुकाध्यक्ष मारुती शिंदे, उपाध्यक्ष शामराव चव्हाण, मार्गदर्शक भैरू भोसले, राजू भोसले मेजर, राजू शिंदे महादेव शिंदे, अनिल इंगोले, राजू इंगोले, सुभाष इंगोले, संतोष इंगोले, लक्ष्मण इंगोले, भगवान इंगोले, संजय चौगुले, पांडुरंग इंगोले, प्रकाश भोसले मेजर, भारत भोसले, अमर भोसले, अर्जुन भोसले विश्वनाथ बाबर, देवानंद बाबर, मनोहर शिंदे, मनोहर शिंदे, सुदेश शिंदे, महादेव शिंदे, श्रीमंत शिंदे, भीमराव भोसले, विश्वनाथ बाबर आदी मान्यवर तसेच समाज बंधू-भगिनी उपस्थित होते.