कोळी महासंघ, सोनार समाजासह अनेक नेते मंडळींचा दिलीप धोत्रे पाठिंबा

पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील कोळी बांधवांनी दिलीप धोत्रे यांच्या पाठीशी उभे राहावे - अरुणभाऊ कोळी

पंढरपूर, दि.१६ : निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे.पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना कोळी महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अरुण भाऊ कोळी यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. धनदांडगे उमेदवार पंढरपूर तालुक्यावर लादले जात आहेत. कायमच पंढरपूर वासियांच्या पाठीशी उभे राहणारे दिलीप धोत्रे हेच पंढरपूरकरांचे खरे उमेदवार आहेत. स्व. आ. भारतनाना भालके यांचे खरे वारसदार आहेत, यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील कोळी समाज बांधवांनी दिलीप धोत्रे यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन अरुणभाऊ कोळी यांनी केले.

शुक्रवारी सकाळी सोनार समाजाच्या वतीने वतीने तर सायंकाळी कोळी महासंघासह पंढरपुरातील आजी-माजी नगरसेवक, अनेक समाजातील नेतेमंडळींचा दिलीप धोत्रे यांना जाहीर पाठिंबा मिळाल्याने पंढरपूरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पंढरपूर शहर आणि तालुक्यात मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे सामाजिक काम चांगले आहे. अनेक राष्ट्रीय आपत्तीच्या काळात येथील नागरिकांच्या मदतीला धाऊन जाण्याचे काम दिलीप धोत्रे यांनी केले आहे. कोरोना काळात याची झलक पंढरपूरमधील नागरिकांनी अनुभवली आहे. यामुळे शहरातील अनेक अल्पसंख्याक समाज त्यांच्याशी जोडले गेले आहेत. याबाबतची आठवण करून देत, कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांनी आपला पाठिंबा दिलीप धोत्रे यांना दिला असल्याचे सांगितले आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील कोळी महासंघाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलीप धोत्रे यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत केले आहे.

याप्रसंगी मनसे उमेदवार दिलीप बापू धोत्रे, शिवसेना नेते काका बुरांडे, तानाजी मोरे, लंकेश बुरांडे, समाजसेवक बाबा चव्हाण, कोळी महासंघाचे प्रसाद कोळी, नागेश नेहतराव, वैभव कोळी, आकाश कानफाटे, अनिल अधटराव, निलेश अधटराव, अजय कडलासकर, कृष्णा वडीगावकर, अक्षय नेहतराव, अक्षय अभंगराव यांच्यासह कोळी महासंघ, सोनार हितकारणी सभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here