मंगळवेढा, दि.१३ : मंगळवेढा तालुका हा वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिला आहे. दुष्काळग्रस्त अशी ओळख असणाऱ्या मंगळवेढा तालुक्याला आजपर्यंत आश्वासनाशिवाय काही मिळाले. पण अनिल सावंत यांनी मात्र या भागाला मोकळी आश्वासने न देता भैरवनाथ शुगर च्या माध्यमातून एक मोठा साखर कारखाना सुरू करून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देत या साखर कारखान्यात अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक लोकांना वैयक्तिकरित्या मदत केली आहे. अशाप्रकारे आभाळाएवढं काम असणारे अनिल सावंत हेच मंगळवेढा तालुक्याचा विकास करू शकतात असे प्रतिपादन तुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या पत्नी शैलजाताई सावंत यांनी केले आहे. मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागात अनिल सावंत यांच्या प्रचारात त्या बोलत होत्या.
अनिल सावंत यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी शैलजाताई सावंत यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावात शैलजाताई सावंत यांनी घरोघरी जाऊन अनिल सावंत यांच्या तुतारी या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी सरपंच सरस्वती निकम, चंद्रप्रभा आप्पासाहेब माने त्यांचेसह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.
शैलजा सावंत यांच्या सोबत त्या त्या गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या त्यामुळे साध्या पद्धतीने सुरू केलेल्या प्रचार दौऱ्याला अक्षरशः रॅलीचे स्वरूप प्राप्त झाले. प्रचार दौऱ्यात असंख्य महिला सहभागी झालेल्या यावेळी दिसल्या.
- विधानसभा निवडणूक सुरू होण्याआधी अनिल सावंत यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महिलांना साड्यांचे वाटप देखील करण्यात आले होते. अनिल सावंत यांनी वाटप केलेल्या साड्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या होत्या अशी त्यावेळी महिलांमध्ये चर्चा रंगली होती. ज्या गावात प्रचार दौरा असेल त्या गावातील महिलांनी शैलजा सावंत यांना होम मिनिस्टर या कार्यक्रमाची आठवण करून देत यावेळी आम्ही अनिल सावंत यांना नक्की मतदान करणार आहोत अशी ग्वाही दिली.