मंगळवेढा, दि.१३ : स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पहिल्यांदाच मंगळवेढा तालुक्यातील मूढवी येथे लोकशाही मार्गाने यंदाची विधानसभा निवडणूक होणार असून गावातील दडपशाही संपवण्याचा चंग येथील तरुणांनी बांधला आहे तो स्वागतार्ह असून मी तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या सोबत असेन असे आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी मूढवी येथील प्रचार सभेत बोलताना दिले.
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी, उचेठाण, बठाण, मूढवी, धर्मगाव, देगाव, घरनिंकी या गावांमध्ये प्रचार सभांचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर सूर्यकांत ठेंगील,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित जगताप, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अशोक चौंडे, रयत क्रांतीचे दीपक भोसले, युवराज शिंदे, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, भाजपचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, प्रकाश आप्पा गायकवाड, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, अशोक माळी, हर्षद डोरले, दिगंबर यादव, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार समाधान आवताडे पुढे म्हणाले, मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मी हजारो कोटींचा निधी देऊन विकासकामे सुरू केली आहेत मात्र तालुक्यातील एकमेव गाव मूढवी हे विकासापासून वंचित राहिले आहे पण यापुढील पाच वर्षाच्या काळामध्ये या गावातील प्रत्येक समस्येचे निवारण केलं जाईल येथील तरुणांमध्ये असणारा प्रचंड उत्साह व ताकद पाहता हा उत्साह व ताकद ही चांगल्या विकास कामासाठी वापरणे गरजेचे आहे चांगल्या कामासाठी मी गावाच्या सदैव पाठीशी राहीन असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. यावेळी प्रास्ताविक करताना मेजर बबन रोकडे म्हणाले की मूढवी गावामध्ये अनेक समस्या असून रस्त्या वाचून येथील मुली बाळांना घरी आणणे मुश्किल झाले आहे दवाखान्याला जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे मुलींना सासरीच डिलिव्हरी करा असे म्हणण्याची वेळ येथील आईबापावर आलेले आहे त्यामुळे आमच्या गावाला निधी द्या आम्ही तुमच्या पाठीशी राहीन, यंदा या गावातून मताच्या रूपातून इतिहास घडेल व लोकशाही मार्गाने या गावात निवडणूक होईल. कोणीही कोणाच्या दबावाला बळी न पडता मत रुपी आशीर्वाद आमदार समाधान आवताडे यांना देऊन आपण या गावात 23 तारखेला दुसरी दिवाळी साजरी करूया असे आवाहन बबन रोकडे यांनी मतदारांना केले.