मंगळवेढा, दि.१२ : शरदचंद्र पवार हे केंद्रात कृषिमंत्री असताना राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांच्या काय अडीअडचणी असतात याची त्यांना जाण असल्याने पवार साहेबांच्या नेतृत्वात सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या विकासासाठी परिवर्तनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या भागातील पाणी प्रश्न दूर करून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या पाणी, शिक्षण आणि रस्ते या समस्यांवरती काम करण्याची गरज आहे.आणि याबाबत मी सर्वप्रथम जातीने लक्ष देऊन या भागाचे नंदनवन करण्याचा माझा मानस असून येत्या निवडणुकीत असंच सहकार्य करून ‘ तुतारी वाजवणारा माणूस ‘ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहनही शेवटी अनिल सावंत यांनी केले.
अनिल सावंत यांनी संपर्क दौरा व पदयात्रा या निमित्ताने प्रचाराचा धडाका उडविला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क दौरा व पदयात्रा यादरम्यान गावांना भेट देत असताना ग्रामस्थांनी अनिल सावंत यांचे उत्साहात स्वागत केले. येत्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आणि जनसामान्यांच्या मूलभूत सुविधांसाठी व त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी मला आपला आमदार म्हणून आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहनही सावंत यांनी यावेळी केले.
अनिल सावंत पुढे म्हणाले, मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सावंत परिवारातील मी सदस्य जरी असलो तरी मी आजपर्यंत कोणत्याही निवडणुकीला सामोरे गेलो नाही किंवा कोणत्याही अधिकृत पक्षाचे काम केले नाही. आजपर्यंत मी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सामाजिक कार्य करीत राहिलो आहे. जो माणूस माझ्यापर्यंत पोहोचला त्या प्रत्येक माणसाला माझ्या पद्धतीने मी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यामुळेच सर्वसामान्य लोकांनी यंदाची विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी मला आग्रह केला. आणि तोही शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे चिन्ह तुतारी या चिन्हावर लढवण्यासाठी केला होता. यामुळेच मी निवडणुकीला सर्वसामान्यांच्या आग्रह खातर तुतारी चिन्हासह सामोरे जातोय.
या प्रचार सभेस तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, राष्ट्रवादी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शिरसट, शिवसेना शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, राष्ट्रवादी युवक युवतीच्या जिल्हाध्यक्षा वृषाली इंगोले पाटील,प्रमोद पुजारी,महादेव चव्हाण, दत्तात्रय नामदेव पाटील, कांतीलाल मोरे,रविंद्र रणे,शुभम पाटील, हर्षद चव्हाण, सुरेश भोसले, आनंद भोसले,प्रकाश चौगुले, दत्तात्रय चव्हाण, सतिश चव्हाण, आण्णासाहेब चौगुले,मारुती डोके, हणमंत बैदरे, विकास डोके,वैभव पाटील,रहाटेवाडीचे रमेश पवार, रणजीत रमेश पाटील, ॲड. उदय चव्हाण, वसंत शेवले,बंडूनाना पाटील,अंकुश गोसावी, रणजीत पाराध्ये यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.