मंगळवेढा, दि.१० : तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर विकासाच्या रूपाने मात केली त्यामुळे मतदारसंघांमध्ये प्रगतीची अनेक कवाडे खुली झाली त्यामुळे या सर्व प्रयत्नांसाठी जनता मला आणखी एका संधीतून सेवा करण्याचा आशीर्वाद देईल असे प्रतिपादन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आ आवताडे यांनी शनिवारी मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी, पाटखळ, महमदाबाद हु, लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, हुन्नूर, नंदेश्वर, खडकी या गावांमध्ये प्रचार दौरा करून जनतेच्या आशीर्वादासाठी साद घातली आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये जनसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय गेल्या ५ वर्षात घेतले गेले आहेत. महायुतीच्या या सरकारमध्ये तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे मतदार संघातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणणे शक्य झाले आहे. गेल्या तीन वर्षात २४ गावे उपसा सिंचन, पंढरपूर येथील एमआयडीसी, तामदर्डी बंधारा विविध रस्ते, पाण्याच्या योजना, विजेचे ट्रान्सफॉर्मर, दवाखाने, शाळा दुरुस्ती विकास काम, विजेचे खांब, वारकरी भवन, मराठा भवन अशा अनेक मोठ्या प्रकल्पाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या विकासाला गतिमान करण्याचा प्रयत्न केला आहे.
मी भावनिक होऊन किंवा मते मिळवण्यासाठी काहीही बोलत नाही. गेल्या विकास कामांची पुस्तिका जनतेसमोर ठेवली आहे. विरोधकांना बोलायचे असेल तर विकास पुस्तिकेचा अभ्यास करून माझ्यासमोर बोलायला, टीका करायला यावे. मी केलेला विकास कामांच्या जोरावरच मतांचा जोगवा मागायला तुमच्यासमोर आलो आहे. मतदार संघाच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत मी कटिबद्ध असून, तीन वर्षात मी मतदार संघात निधीच्या रूपाने विकासाचा डोंगर उभा केला आहे त्यामुळे विकासाची ही मालिका अखंडपणे सुरू राहण्यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून मला आशीर्वाद द्यावेत असे आवाहन आमदार आवताडे यांनी केले आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय जमदाडे, भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, शिवसेना तालुका अध्यक्ष अशोक चौंडे, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अजित जगताप, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, राहूल सावंजी, श्री संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक औदुंबर वाडदेकर, गौडाप्पा बिराजदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगन्नाथ रेवे, संभाजी घुले आदी मान्यवर तसेच विविध गावांचे सरपंच उपसरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक पदाधिकारी भाजपा व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[…] मतदारसंघांमध्ये प्रगतीची कवाडे खुली … […]