मनसेचे इंजिन सुसाट ; राज ठाकरेंच्या सभेने बदलली मतदारसंघातील राजकीय गणिते

कोण आहेत हे मनसे उमेदवार दिलीप धोत्रे : एकच बापू, तीन दादांना भारी पडणार काय?

पंढरपूर, दि.०८ : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी मंगळवेढा येथे सभा घेऊन पंढरपूर मतदार संघातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. या सभेत त्यांनी विविध प्रश्न उपस्थित करीत आजपर्यंतच्या सरकारने फक्त आश्वासने देण्याची काम केली परंतु पदरी निराशाच पडली त्यामुळे आता मनसेला एकदा संधी द्या मग पहा विकास म्हणजे असतो तरी काय हे दाखवून देतो असे सांगितले. भर उन्हात राज ठाकरे यांच्या सभेला हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहत आम्ही मनसे सोबत असा नारा दिल्याने याची चर्चा पंढरपूर मतदार संघातच रंगली नाही तर ती राज्यभर चांगलीच रंगली आहे. राज ठाकरेंच्या सभेने मनसेचे इंजन आता सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेत सुसाट सुटले आहे. 

याच सभेत मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी पदे वंश परंपरेने मिळवायची नसतात तर या पदावर विजय विराजमान होण्यासाठी अंगी कर्तुत्व असायला हवे असे ठणकावून सांगत सत्तेत नसतानाही गेल्या काही वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. एक दगडफोड्याचा मुलगा ते दिलीप धोत्रे हे नाव कमवायला खूप काही सोसलं, भोगलं, गमावलं हे सांगत त्यांनी दिलीप धोत्रे कोण आहेत याची ओळखच मतदारसंघाला करून दिली.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे दिलीपबापू धोत्रे, भाजपाचे समाधानदादा आवताडे, काँग्रेसचे भगीरथदादा भालके, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिलदादा सावंत अशी तीन दादा आणि एक बापू मध्ये थेट लढत होत आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या चारही उमेदवारांच्या कामाची तुलना मतदारांकडून केली जात आहे.

यामध्ये विद्यमान भाजपा आमदारांकडून तीन कोटीची विकास कामे केल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा विकास कागदावरच असल्याचा आरोप होत आहे. तर काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीपुरतेच जनतेच्या संपर्कात असतात अशी टीका होत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नवख्या उमेदवाराला संधी दिल्याने ते जनतेपर्यंत पोहोचू शकणार नाहीत असा दावा केला जात आहे. मात्र मनसेकडून देण्यात आलेले उमेदवार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून न काम करता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायमच उपलब्ध असतात. त्यामळे सत्तेत नसतानाही त्यांनी केलेल्या कामामुळे बापू म्हणून ओळखले जाणारे दिलीप धोत्रे या मतदारसंघात विविध पक्षाकडून उभ्या असलेल्या दादांना भारी पडणार का ? हा प्रश्न चर्चेला आलेला आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांनी सभेत वेळी आक्रमक शैलीत केलेले भाषण व विविध प्रश्नांना फोडलेली वाचा जशी मतदारांना भावली तसेच दिलीप धोत्रे यांनी दिलीप धोत्रे हा कोण आहे असा स्वतःलाच प्रश्न उपस्थित करत व त्या प्रश्नांची उत्तरे जनतेसमोर मांडत सर्वांनाच आपलेसे केले.

चला तर मग आपणही पाहुयात दिलीप धोत्रे कोण आहेत.

– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रथमतः पाच उमेदवारांची घोषणा केली होते. त्यात पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांचे नाव जाहीर केले होते. दिलीप धोत्रे हे गेल्या 33 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हाही दिलीप धोत्रे हे राज ठाकरे समर्थक म्हणून ओळखले जायचे. 1991 पासून भारतीय विद्यार्थी सेना, कॉलेज शाखाप्रमुख, गटप्रमुख, उप तालुकाध्यक्ष , तालुका अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, शहराध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी शिवसेनेमध्ये असताना भूषवली. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर त्यांच्यासोबत दिलीप धोत्रे आले. दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यात मोठे योगदान दिलं आहे. अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. शिबिरांपासून लोकोपयुक्त अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत. मनसेचे सध्या ते प्रमुख नेते आहेत. याआधी मनसेचे उपनेते त्याचप्रमाणे शहर अध्यक्ष पदही त्यांनी भूषवलं आहे. 2009 ला विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यात आलं होतं मात्र ते कमी मतांनी निवडणूक हरले होते. आता पुन्हा त्यांना विधानसभेचं तिकीट मनसेतर्फे देण्यात आला आहे. त्यांच्यावर मनसेने विश्वास टाकला आहे.

– आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे दिलीप बापू धोत्रे यांनी मागील अनेक वर्षांपासून मतदार संघातील नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले आहे. पंढरपुरातील नागरिकांचा वाढीव कर माफ करणे, हिंदू, मुस्लिम स्मशानभूमी दुरुस्ती , रस्ते खड्डे मुक्त करणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आर्थिक मदत करणे, बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग उभा करून देणे याचबरोबर कोरोना काळात त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती तसेच एकही नागरिक उपाशी झोपणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती. त्यामुळे दिलीप बापू धोत्रे यांच्याकडे सर्वसामान्यांना मदत करणारे नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्ते, वीज, पाणी आणि विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरात लवकर एमआयडीसी उभा करणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे हे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत मतदारांना अपलेसे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here