महायुतीच्या विजयाच्या दृष्टीने भक्कम मोर्चेबांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा ; महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समविचारी आघाडी यांचा पुढाकार 

माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

मंगळवेढा, दि.०९ : महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समविचारी आघाडी यांच्या पुढाकाराने श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्याला भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या विजयाच्या दृष्टीने भक्कम मोर्चेबांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आले.

महायुतीच्या विजयासाठी राबणारा प्रत्येक कार्यकर्ता आणि मतरूपी आशीर्वाद देणारी जनता हे दोन्ही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा अविभाज्य घटक आहे, असे मत समाधान आवताडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मतदारसंघात विकासाभिमुख धोरण आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि महायुतीच्या कल्याणकारी योजना सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी महायुतीचा विजय महत्वाचा आहे.

तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी समविचारी आघाडी महायुतीच्या बाजूने भक्कपणे उभी असेल, असे समविचारी आघाडीचे नेते अजित जगताप यांनी उपस्थितांनां संबोधताना मत व्यक्त केले.

सदर मेळाव्या प्रसंगी जेष्ठ नेते रामचंद्र जगताप, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्य सरचिटणीस लतिफ तांबोळी, व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, माजी संचालक लक्ष्मण जगताप, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे, माजी नगराध्यक्ष विजयकुमार खवतोडे, माजी उपगराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, चंद्रकांत पडवळे, आप्पासाहेब चोपडे, माजी नगरसेवक अजित जगताप, प्रवीण खवतोडे, महादेव भाऊ जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा संघटक युवराज घुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष मुझ्झमिल काझी, संभाजी घुले, सोमनाथ बुरजे, बाळदादा नागणे, माधुरी हजारे, छायाताई मेटकरी, सुनीताताई मेटकरी, रेखाताई साळुंखे, माकानदार भाभी, राहुल आप्पा सावंजी, चंद्रकांत पडवळे, सरोजभाई काझी, सोमनाथ बुरजे, नजीरभाई इनामदार, शिवानंद पाटील, बबलू सुतार, विक्रम भगरे, किशोर दत्त, अशोक माळी, बशीरभाई बागवान आदी मान्यवरांसह समविचारी आघाडीचे कार्यकर्ते, महायुतीचे सर्व पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व मंगळवेढा ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here