विकासाच्या अनुषंगाने जनतेची दिशाभूल करण्याचा विरोधकांचा कुटील डाव , तथ्यहीन टिकेला उत्तर न देता मतदारसंघाला विकासाचे रोल मॉडेल बनवणे हाच माझा ध्यास-आमदार आवताडे

मंगळवेढा, दि.०८ : सध्याच्या राजकारणात विरोधकांकडून कुटीचे डाव टाकून विकासाच्या अनुषंगाने जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. पण त्यांच्या बिनबुडाच्या आणि तथ्यहीन टीकेला मी उत्तर देत न बसता माझ्या कामातून व विकास कार्यातून मी आपणा सर्वांच्या समोर मतदारसंघाला विकासाचे रोल मॉडेल तयार करून दाखवीन असे म्हटले आहे. मतदार संघातील युवकांची बेरोजगारी संपुष्टात आणून व्यावसायिक दृष्टिकोनातून उद्योगधंदे उभारणे व मतदार संघाला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्याची माझी जिद्द असल्याचे त्यांनी सांगितले आहे. माझ्या आमदारकी कालखंडात मतदार संघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधत असताना कोणत्याही प्रकारचे राजकारण आड न आणता सर्व समावेशक समाजकारण करण्याच्या दृष्टीने मी निधीचा डोंगर उभा केला आहे त्यामुळे विकास निधीचा हिशोब मागणाऱ्यांना या निवडणुकीमध्ये जनताच धडा शिकवेल असे प्रतिपादन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी प्रचार दौऱ्या दरम्यान केले.

आवताडे पुढे म्हणाले, आपल्या मतदारसंघात यापूर्वीच्या निवडणुका पाणी प्रश्नावर झाल्या. आमदार झाल्यापासून तीन वर्षात पाणी प्रश्न शंभर टक्के सोडवल्याने तालुक्यातील शेती सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. केवळ ३ वर्षात तीन हजार कोटीहून अधिक निधी मतदारसंघाच्या विकासासाठी खेचून आणला आहे. मतदार संघामध्ये एमआयडीसी आणल्याने तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी मला आणखी एकदा आपल्या आशीर्वादाच्या रूपाने संधी द्या असे आवाहन त्यांनी केले. पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा निवडणूकीसाठी आमदार आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील अकोला, शेलेवाडी, गणेशवाडी, खुपसंगी, जुनोनी, शिरसी, लेंडवे चिंचाळे या गावांचा प्रचार दौरा करून ग्रामस्थांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला.

सदर प्रचार दौऱ्यादरम्यान विविध गावातील महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या राजकीय नेतृत्वावर विश्वास ठेवून व महायुतीचे सरकारच्या कामाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करून आमदार समाधान आवताडे यांना या निवडणुकीमध्ये आपला पाठिंबा दर्शवला आहे. नवप्रवेशित सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आवताडे यांनी स्वागत करून पक्षामध्ये त्यांना योग्य ती सन्मानाची वागणूक दिली जाईल असे सांगितले.

यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, शिवसेना अध्यक्ष अशोक चौंडे, माजी संचालक सुरेश भाकरे, राजन पाटील, भुजंगराव आसबे, विजय माने, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय जमदाडे, भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, कृषिभूषण अंकुश पडवळे, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव आदी मान्यवर तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ व नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या विकास कामांची नोंद सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. तालुक्यातील शेतीच्या व पिण्याचा पाण्याचा प्रश्न समाधान दादांनी सोडवला आहे. विकासाची ही मालिका अखंडपणे सुरु ठेवण्यासाठी आणि आपल्या पुढील पिढ्यांच्या सर्वांगीण उज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून समाधान दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणे ही आजची गरज आहे.

-हिंमत अशोक पाटील- प्रगतशील बागायतदार, लेंडवे चिंचाळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here