महाराष्ट्रात चार पक्ष आलटून पाठवून सत्तेवर येऊनही प्रश्नांची सोडवणूक नाही, एक वेगळा पर्याय म्हणून मनसेला संधी दिल्यास प्रश्नांची सोडू नको करू – राज ठाकरे 

मंगळवेढा येथे प्रचार सभा : मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी मनसेला साथ देण्याचे दिले अभिवाचन

मंगळवेढा, दि.०६ : गेली साठ वर्ष त्याच त्या प्रश्नावर निवडणूक लढवली जात आहे. काहीही प्रश्नांची सोडवणूक का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित करत राज्यात चार पक्ष आलटून पालटून सत्तेवर येतात परंतु कोणतीही प्रश्न सुटले नाहीत. या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेला संधी द्या राज्यातील बहुतांश प्रश्न सोडवले जातील. येत्या पाच वर्षात आम्ही सोडवलेले प्रश्न पाहून आपण भविष्यात नेहमीच मनसेलाच असा विश्वास आम्हाला वाटतो असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

ते मंगळवेढा येथे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. राज ठाकरे पुढे म्हणाले, मी आपल्यासमोर दोन गोष्टीसाठी आलोय. एक तुमचे दर्शन घेण्यासाठी तर दुसरी गोष्ट म्हणजे उमेदवारांसाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे.मंगळवेढा तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त म्हणून आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आजपर्यंत सत्तेवर आलेल्या लोकांनी काय कामच केले नाही. आजपर्यंत आपण ज्यांना निवडून दिले त्यांना आपली ओळख अशी कशी म्हणून प्रश्न विचारावा. आपण राजकारण्यांना प्रश्न विचारले नाही म्हणून ही आपली ही हालत झाली आहे. आपले तरुण तरुणी पुणे , मुंबई येथे नोकरीसाठी जातात परंतु आपण जिकडे असेल तेथे तिकडे रोजगार आणून देईन. कुणालाही नोकरीसाठी घरदार सोडण्याची गरज नाही हे काम मनसे करेल आणि हे सहज शक्य आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आले, महिला व तरुणी पळविल्या जात आहेत, बलात्कार होत आहेत आणि सर्वजण निवडणुकीत गुंतले आहे. या साऱ्या लाजिरवाण्या बाबींना लगाम घालण्याची इच्छाशक्ती सत्तेवरील राजकारण्याकडे नाही.

आज पर्यंत भूलथापा मारल्या त्यांनाच आपण मतदान केले आता एक वेगळा पर्याय निवडा. आपल्या कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक न करणाऱ्या चार पक्षांना आज पावतो आपण निवडून दिले, आता आमचा पाचवा पक्ष एक औषध म्हणून वेगळा पर्याय निवडत प्रयोग करा मग पहा आजार नीट होतोय की नाही. राज्यात लाडकी बहिण योजना देत असताना महागाई वाढली आहे. फक्त लाडकी बहीणच दिसते लाडके भाऊ काय मेले की काय असा असा प्रतीप्रश्नही त्यांनी यावेळी केला. राज्यात सत्तेत नसताना लोकांना नोकरी देण्याची काम केले. सत्ता नसताना नोकरी देतो व मग सत्ता आल्यावर काय करेन हे ध्यानी घ्या. हे महाराष्ट्र राज्य मोठे आहेच परंतु याहून अधिक महान बनवण्याची जबाबदारी माझी राहील. येत्या वीस तारखेला गुलाम म्हणून न राहता स्वतः मालक होण्यासाठी तुमच्यासमोर सक्षम पर्याय असलेल्या मनसेला संधी द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमदेवार दिलीप धोत्रे यांनी यावेळी सांगितले की, पंढरपूर मतदारसंघातील विद्यमान आमदारांना प्रत्येक मतदाराने हे विचारणे गरजेचे की गावांसाठी, शेतकरी, महिला, युवकवर्ग, युवा उद्योजक यांच्यासाठी काय काम केले. मतदारसंघात ४२०० कोटी निधी आला आहे असे ते सांगतात. या विकासनिधीच्या हिशोबाने प्रत्येक गावासाठी ४० कोटी निधी आला असता तर ही गावे सोन्याची झाली असती. आपली गावे सोन्याची झाली आहेत का हे पहा म्हणजे खोटे विकासाचे राजकारण करत आपणास फसविले आहे. खोटे बोलून निवडून यायचे व जनतेला विसरून जायचे हा यांचा नेहमीचा फंडा आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात उभे राहिलेल्या सर्व उमेदवारामध्ये सर्वात जास्त शिक्षण माझे झाले असल्याने मी आपणास अधिक समजून घेऊ शकतो. शेतमजुराचा मुलगा, गरीब घराचा मुलगा, दगडफोड्याचा मुलगा ही ओळख असतानाही अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनो काळात सर्वोपरी मदत करण्याचे काम केले आहे.

धोत्रे पुढे म्हणाले, बहुजनांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. जातीवाद प्रचंड प्रमाणात वाढलेला असून जातीधर्माच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम सुरू आहे. लोकांना विकासाच्या नावाखाली फसविले जात आहे. मी काम करणारा माणूस आहे त्यामुळे माझे काम पाहून मला विजयी करा.

लक्षवेधी –

१. महिलांची प्रचंड उपस्थिती

२. राज ठाकरे यांचे भाषण साडेतीन वाजता सुरू होऊनही एक वाजलेपासून मतदारांची उत्साही उपस्थिती

३. राज्यभरातून हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती

४. संयोजकाकडून ऑक्टोबर हिटचे वातावरण असताना सर्व सोयी सुविधा

५. सुमारे वीस ते पंचवीस हजार नागरिकांची उपस्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here