मंगळवेढा, दि.०५ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या बुधवार (दि.०६) रोजी दुपारी एक वाजता मंगळवेढा येथे येणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ दुपारी एक वाजता मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक येथील आठवडा बाजार येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. एक स्पष्टवक्ते नेतृत्व म्हणून राज्यभर त्यांची ख्याती असल्याने राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी मंगळवेढेकर अतुर झाले असून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ही सभा होत असल्याने या सभेत ठाकरे कोणाला आपले लक्ष करणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचाराला सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यातच पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवाराची सभा घेत असून त्यानिमित्ताने ते मंगळवेढा येथे आहेत. राज ठाकरे यांनी पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघांमध्ये वैयक्तिक लक्ष घातले असून गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेस अमित ठाकरे हे उपस्थित राहिले होते. त्यावेळी पासून मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण मतदारसंघांमध्ये सुरू झाली असून मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी बेरजेचे राजकारण करत प्रचाराला सुरुवात सुरुवात केली त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना हून्नूर येथील श्री बिरोबा, हुलजंती येथील महालिंगराया, मंगळवेढा येथे श्री संत दामाजी, संत चोखामेळा पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन पंढरपूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणुकीच्या अगोदर दिलीप धोत्रे यांनी हजारो हिंदू बंधूभगिनींना काशी, आयोध्या, तुळजापूर ची तुळजाभवानी,कोल्हापूरची आई अंबाबाई, आदमापुर ला बाळूमामा तसेच हजारो मुस्लिम बांधवांना अजमेर,हजारो बौद्ध बांधवांना दीक्षाभूमी नागपूर यात्रा काढून दर्शन घडवले होते. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अनेक प्रश्नांना दिलीप धोत्रे यांनी वाचा फोडली असून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहा नोव्हेंबर २०२४ रोजी मंगळवेढा येथे येत असून राज ठाकरे यांच्या सभेची जनतेत चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांची महाराष्ट्रात सर्वात अगोदर उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी गेल्या दिड महिन्यापासून प्रचाराचा धडाका चालवला असल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. दिलीप धोत्रे हे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावे पिंजून काढत असून त्यांच्या सभांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध पक्षाचे, गटाचे कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघातील वातावरण मनसेमय झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केलली आहे.