सोलापूर, दि.०४ : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात 184 उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडी व महायुती यांच्यात विधानसभेचा आखाडा रंगणार असला तरी अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी ही निवडणूक आखाड्यात चांगलीच रंगत निर्माण केली आहे. बार्शी, अक्कलकोट व माळशिरस विधानसभा मतदारसंघात दुरंगी, करमाळा, माढा, मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, सांगोला या ठिकाणी तिरंगी तर दक्षिण सोलापूर व पंढरपूर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढती होणार आहे. महाविकास आघाडी विरोधात महायुती असा सामना रंगणार असला तरी पंढरपूर मतदार संघात आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस यांनी आपले स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघ व लढती-
244- करमाळा
– आ. संजयमामा शिंदे (अपक्ष), नारायण पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट), दिग्वीजय बागल (शिवसेना-शिंदे गट)
245- माढा
– रणजितसिंह शिंदे (अपक्ष), मीनल साठे (राष्ट्रवादी अजित पवार गट), अभिजीत पाटील (राष्ट्रवादी-शरद पवार गट)
246- बार्शी
– आ. राजेंद्र राऊत (शिवसेना-शिंदे गट), दिलीप सोपल (शिवसेना-ठाकरे गट)
247- मोहोळ (अ.जा.)
– आ. यशवंत माने (राष्ट्रवादी अजित पवार गट), राजू खरे (राष्ट्रवादी-शरद पवार गट), संजय क्षीरसागर (अपक्ष)
248- सोलापूर शहर उत्तर
– आ. विजयकुमार देशमुख (भाजप), महेश कोठे (राष्ट्रवादी शरद पवार गट, शोभा बनशेट्टी (भाजप बंडखोर)
249- सोलापूर शहर मध्य
– देवेंद्र कोठे (भाजप), चेतन नरोटे (काँग्रेस), नरसय्या आडम (माकप), फारुख शाब्दी (एमआयएम)
250- अक्कलकोट
– आ. सचिन कल्याणशेट्टी (भाजप), सिद्धाराम म्हेत्रे (काँग्रेस)
251- दक्षिण सोलापूर
– आ. सुभाष देशमुख (भाजप), अमर पाटील (शिवसेना-ठाकरे गट), महादेव कोगनुरे (मनसे), धर्मराज काडादी (अपक्ष)
252- पंढरपूर
– आ. समाधान आवताडे (भाजप), अनिल सावंत (राष्ट्रवादी-शरद पवार गट), भगिरथ भालके (काँग्रेस), दिलीप धोत्रे (मनसे)
253- सांगोला
– आ. शहाजी पाटील (शिवसेना-शिंदे गट), दीपक साळुंखे-पाटील (शिवसेना-ठाकरे गट), बाबासाहेब देशमुख (शेकाप)
254- माळशिरस (अ.जा.)
– आ. राम सातपुते (भाजप), उत्तम जानकर (राष्ट्रवादी-शरद पवार गट)