पंढरपूर, दि.०४ : पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेणेच्या वेळेनंतर 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत मात्र भाजप व महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे, मनसेचे दिलीप धोत्रे, राष्ट्रीय काँग्रेसचे भगीरथदादा भालके, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत यांच्यातच रंगणार आहे. आपण झेप संवाद न्यूज वर ही बातमी वाचत आहात. राज्यभर राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस- शरद चंद्र पवार यांची महाविकास आघाडी असली तरी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून भगीरथदादा भालके व राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत हे दोन जण उमेदवार रिंगणात असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहेत. महाविकास आघाडीतील ही बिघाडी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार की महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरणार हे येणारा काळच ठरविणार आहे.
(एक) मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्य स्तरावरील राजकीय पक्षाचे उमेदवार पुढीप्रमाणे –
भारतीय जनता पार्टी
१. आवताडे समाधान महादेव, मु.पो. खंडोबा गल्ली, मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर ४१३३०५
बहुजन समाज पार्टी
२. दत्ता रामचंद्र वाडेकर, १०६/२अ/८, के.बी.पी. महाविदयालय, पंढरपूर, ता.पंढरपूर, जि. सोलापूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
३. धोत्रे दिलीप काशिनाथ, ४२२२, भोसले चौक, कडबे गल्ली, पंढरपूर, जि. सोलापूर
इंडियन नॅशनल काँग्रेस
४. भालके भगिरथदादा भारत, भाऊ स्मृति, भैरवनाथ विदयालयाशेजारी, भालके वस्ती. सरकोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार
५. सावंत अनिल सुभाष, मु.पो. लवंगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर, पिन- ४१३३१९
(दोन) नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार)
वंचित बहुजन आघाडी
६. अशोक रंगनाथ माने, मु.ढवळस, पो. सिध्देवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर
राष्ट्रीय समाज पक्ष
७. पंकज हरिश्चंद्र देवकते, मु.पो. ईश्वर वठार, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी
८. राजेंद्र बापू बेदरे, मु.पो. बठाण, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर
अखिल भारतिय सेना
९. सुदर्शन रायचंद खंदारे, घ.नं. ३६६३, भाई-भाई चौक, ढोर गल्ली, संतपेठ पंढरपूर, जि. सोलापूर
अपक्ष उमेदवार पुढीलप्रमाणे –
१०. अब्दुलरोफ उर्फ रज्जाक जाफर मुलाणी, मु.पो. गट नं. ३०, प्लॉट नं. २६. MSEB. सांगोला रोड, पंढरपूर, ता.पंढरपूर, जि. सोलापूर
११. आण्णा सुखदेव मस्के, मु.पो. गादेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, पिन- ४१३३०४
१२. आशफान अब्दुल सय्यद, मु.पो. गोपाळपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
१३. गायकवाड अमोल सुरेश, मु.पो. अनवलो, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
१४. तुळजाराम भिमराव बंयपट्टे, नविन एस.टी. स्टॅन्ड समोर, ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
१५. दर्शना श्रीगणेश माने देशमुख, मायनर शाळा वस्ती, कासेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
१६. निशिकांत बंडू पाटील,मु.पो. २९१, शिवाजी नगर, गोपाळपुर, ता. पंढरपुर, जि. सोलापूर
१७. बिराप्मा मधुकर मोटे, मु.पो. तनाळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
१८. मुजावर युसुफ राजमहंमद, मु.पो. सुलेमान चाळ, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
१९. ॲड. मेटकरी बापू दादा, मु.मेटकरवाडी, पो. पाटखळ, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर
२०. वाघमारे संजय हणमंत, मु.पो. मगरवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
२१. विठल भिमराव भोरकडे, मु.पो. सोड्डी. पो.शिवणगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर
२२. श्रीकांत श्रीमंत नलावडे, मु. नारायण चिंचोली, पो. तुंगत, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
२३. सिध्दाराम सोमण्णा काकणकी, मु.पो. सिध्दापूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर
२४. ज्ञानेश्वर अरुण पंचवाघ, मु.पो. यत्तचाळ, माळीनगर, ता. माळशिरस,जि. सोलापूर