मंगळवेढा, दि.०१ : पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे प्रत्येक गावत भेट देत असून तेथील नागरिकांशी संवाद साधत आहेत. मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी, तांडोर, सिद्धापूर, अरळी, बालाजीनगर येथील नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांनी यापूर्वीचे आमदारांनी मंगळवेढा तालुक्यात पाणी आणतो म्हणून जनतेची दिशाभूल केली असून विकास कामांसाठी निधी आणला असे खोटे बोलत आहेत. मनसेला विजयी करा, मतदारसंघातला एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी यावेळी दिली.
दिलीप धोत्रे पुढे म्हणाले,आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे मागील अनेक वर्षांपासून मतदार संघातील नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे. पंढरपुरातील नागरिकांचा वाढीव कर माफ करणे, हिंदू, मुस्लिम स्मशानभूमी दुरुस्ती , रस्ते खड्डे मुक्त करणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करणे, बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग उभा करून देणे याचबरोबर कोरोना काळात त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती, तसेच एकही नागरिक उपाशी झोपणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती. सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्ते, वीज, पाणी आणि विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरात लवकर एमआयडीसी उभा करणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी मनसेला साथ द्या.
सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे नेतृत्व म्हणून दिलीप धोत्रे यांची ओळख असून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार तथा मनसे नेते दिलीप धोत्रे यांना निवडून आणण्याचा निर्धार मतदारसंघातील नागरिकांनी केला आहे.