पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मनसेला विजयी करा : दिलीप धोत्रे 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतील खुपसुंगी, गोणेवाडी, शिरसी, जुनोनी, खडकी येथील ग्रामस्थांशी मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी साधला संवाद

मंगळवेढा, दि.३१ : पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी संवाद साधला. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मनसेला विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी, गोणेवाडी, शिरशी, जुनोनी,खडकी येथील नागरिकांशी संवाद साधत असताना दिलीप धोत्रे यांनी म्हणाले की, यापूर्वीचे आमदारांनी मंगळवेढा तालुक्यात पाणी आणतो म्हणून जनतेची दिशाभूल केली असून विकास कामांसाठी निधी आणला असे खोटे बोलत आहेत. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे मी  मागील अनेक वर्षांपासून मतदार संघातील नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे. पंढरपुरातील नागरिकांचा वाढीव कर माफ करणे, हिंदू, मुस्लिम स्मशानभूमी दुरुस्ती , रस्ते खड्डे मुक्त करणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करणे, बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग उभा करून देणे याचबरोबर कोरोना काळात त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी कोविड हॉस्पिटलची निर्मिती, तसेच एकही नागरिक उपाशी झोपणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती. त्यामुळे माझ्याकडे यांच्याकडे सर्वसामान्यांना मदत करणारे नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्ते, वीज, पाणी आणि विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरात लवकर एमआयडीसी उभा करणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी मतदारसंघातील नागरिकांनी मनसेला साथ द्यावी असे आवाहनही दिलीप धोत्रे यांनी यावेळी केले.

यावेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांना विजयी करण्याचा मतदारसंघातील नागरिकांनी निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here