सामान्य जनतेचा सर्वांगीण विकास हेच माझ्या राजकारणाचे व्हिजन- आमदार समाधान आवताडे 

मंगळवेढा येथे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद

मंगळवेढा , दि.३० : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकास हेच माझ्या राजकारणाचे व्हिजन असल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयाच्या भक्कम मोर्चेबांधणीसाठी महायुती तसेच मित्रपक्षांच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची अत्यंत उत्साही वज्रमूठ पाहायला मिळाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीच्या तसेच मित्रपक्षांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर बैठकीदरम्यान जोशपूर्ण सहभाग नोंदवला होता. मित्रपक्ष, महायुतीच्या या मोर्चेबांधणीत प्रत्येक कार्यकर्ता प्रचाराचं केंद्र बनून पुढील वाटचाल अधिक प्रभावीपणे करील, असा विश्वास या निमित्ताने आपले आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना व्यक्त केला.

यावेळी तालुक्यातील विविध मान्यवरांनी आपापले मनोगत मांडताना सांगितले की, रस्ते, वीज, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा, आणि आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी आ आवताडे यांनी हजारो कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आ आवताडे पुनःश्च निवडून आल्यास या विकासकामांना आणखी परिवर्तनाची धार प्राप्त होईल असेही त्यांनी सांगितले.

सदरप्रसंगी व्यासपीठावर भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय जमदाडे, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे, माजी सरपंच तानाजी पाटील, माजी संचालक सुरेश भाकरे, राजन पाटील, सचिन शिवशरण, सुरेश जोशी, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, डॉ वृषाली पाटील, चंद्रकांत जाधव, काकासाहेब मिसकर, शिवाजीराव पटाप, जगदीश पाटील, सरपंच अनिल पाटील, बिरुदेव घोगरे, शाम आसबे, प्रहार युवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष पवार, आदी मान्यवर व मोठ्या संख्यने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भाजपा व महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here