पंढरपूर विधानसभा मतदारसंघ : महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांचा अर्ज दाखल

विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाला साथ द्या; समाधान आवताडे यांचे अवाहन 

पंढरपूर, दि.२७ : महाराष्ट्र विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे यांनी यांनी आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी पंढरपूर विधानसभा मतदार संघ यांच्याकडे दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक व पंढरपूर , मंगळवेढा तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, भाजप, महायुती व सर्व नेते मंडळी यांनी विश्वास दाखवून मला उमेदवारी दिलेली आहे. या निवडणुकीत निश्चितच गुलाल उधळला विजय आपलाच होणार आहे. गतवर्षी तीन-चार हजार मताच्या फरकाने विजयी झालो असलो तरी आता आपल्या सर्वांच्या साथीमुळे 37 ते 39 हजार मतांनी आपला विजय निश्चित होणार आहे. जनता बरोबर असल्यामुळे आपल्याला विरोधात कोण उभे आहेत याचे काही वाटत नाही. ही निवडणूक आपण विकासाच्या बळावर लढतोय. सर्वसामान्य जनता, शेतकरी, माता-भगिनी यासाठी अनेक कामे केली. मंगळवेढ्यातील पाणी प्रश्न अनेक वर्ष कायमचा मितवा यासाठी सुरुवात करण्यात आलेली मंगळवेढ्याची पाण्याची योजना निश्चितच येत्या पाच वर्षात पूर्ण होईल व शेतकऱ्याचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. पंढरपुरातही बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी पंढरपूर येथील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावला. भविष्यात अध्यात्माची नगरी म्हणून ओळखली जाणारी पंढरपूर नगरी उद्योग नगरी म्हणून ओळखली जाईल.

गेल्या अडीच वर्षात अनेक विकास कामे केली, येत्या पाच वर्षात पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात कोणतीही काम शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही देत समाधान आवताडे पुढे म्हणाले की, महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सन्मान देण्याचे काम केले, विविध पाणी पुरवठा योजना मार्गी लावल्या, विज बिल माफ केले, रस्त्यांची कामे पूर्णत्वास नेली, वाढत्या बेरोजगारीला लगाम घालण्यासाठी विविध योजना आणल्या. त्यामुळे ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर मी लढत आहे. विरोधकांकडे कोणतेही व्हिजन नसल्याने ते नानाविध अफवा पसरवण्याचे काम करत आहेत त्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाला साथ द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here