मंगळवेढा, दि.२७ : भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज सोमवार (दि.२८) रोजी. दुपारी १.३० वाजता युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक तसेच काही मोजक्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसमवेत भरणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालय यांच्याकडून देण्यात आली आहे.
विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचे सासरे बाळासाहेब श्रीहरी नाडे यांचे परवा निधन झाल्याने आमदार आवताडे यांचा कोणत्याही प्रकारे शक्तीप्रदर्शन अथवा रॅली न करता साध्या पद्धतीने अर्ज भरण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आमदार आवताडे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक विकास कामे मार्गी लागल्याने भारतीय जनता पार्टी व महायुतीने त्यांना या मतदारसंघात दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नियोजित निवडणूकीसाठी ते आपला उमेदवारी अर्ज पंढरपूर येथे संबंधित निवडणूक अधिकारी यांचेकडे सादर करणार आहेत. त्यामुळे भाजपा व महायुतीच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात तसेच गावात मतदारांशी संपर्क ठेवून आमदार आवताडे यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करणेबाबत आवाहन करण्याच्या अनुषंगाने प्रचार करावा असे जाहीर करण्यात आले आहे.