महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या 14 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. याअगोदर काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली होती. तर, दुसऱ्या यादीत 23 आणि तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर, आता काँग्रेसने 14 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंढरपूर मतदारसंघातून माजी आमदार स्वर्गीय भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना संधी देण्यात आली आहे तर सोलापूर दक्षिण मतदार संघातून दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात येते आहे. सोलापूर दक्षिण मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून याअगोदर अमरजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने आता मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसनेही दिलीप माने यांना उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. तसेच पंढरपूर बाबतही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे पंढरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) उमेदवार देणार की भगीरथ भालके यांच्याबरोबर राहून आपला मित्र धर्म पाळणार याकडे साऱ्या मतदारांचे लक्ष लागून राहिली आहे.
पंढरपूर मतदारसंघातून भगिरथ भालकेंना मैदानात उतरवण्यात आले आहे. भगिरथ भालके यांनी या अगोदरच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आता मात्र काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अशी आहे काँग्रेसची 4 थी यादी-
1.अमळनेर – अनिल शिंदे
2.अमरेड – संजय मेश्राम
3.आरमोरी – रामदास मश्राम
4.चंद्रपूर – प्रवीण पडवेकर
5.बल्लारपूर – संतोषसिंह रावत
6.वरोरा- प्रवीण काकडे
7.नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार
8.ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे
9.नालासोपारा- संदीप पांडेय
10.अंधेरी पश्चिम- अशोक जाधव
11.शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट
12.पुणे छावणी- रमेश बागवे
13.सोलापूर दक्षिण- दिलीप माने
14.पंढरपूर- भगिरथ भालके