मंगळवेढ्यापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पूर्व-पश्चिम आणि दक्षिण- उत्तर पसरलेल्या काळया शिवाराकडे जाण्यासाठी किंबहुना जाणाऱ्या पायवाटा भक्कम व्हाव्यात अशा स्वरूपाच्या रस्त्याचे काम नुकतेच मार्गी लागले. नुसतेच मार्गी लागले नव्हे त्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाली. गेली ३० ते ३५ वर्षे किंबहुना त्याहून अधिक काळ चांगल्या रस्त्याच्या प्रतिक्षेत असणारं हे ज्वारीचं कोठार शेतकऱ्यांना भरभरून धान्याचं वाण देतं राहिलं. ते धान्य घरी आणण्याची जबाबदारी आणि काळजी शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना पडणार नाहीतर कोणाला पडणार ? त्यासाठी त्या वाटेनं जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जाण्या येण्याची तजवीज व्हावी या उद्देशानं मंगळवेढा मुंढेवाडी हा जुना रस्ता भक्कम आणि डांबरी रस्ता आजपर्यंत प्रतिक्षेत होता. शेतकऱ्यांच्या हाताला, मजुरांच्या हाताला काम मिळून पोटभर त्यांच्यांकडं काहीतरी शिल्लक असावं या उद्देशानं या जुन्या मुंढेवाडी रस्त्याचे काम आमदार आवताडे यांनी मनावर घेतलं आणि ते सुरू देखील केलं. आमदार आवताडे साहेबांचे प्रयत्न आज फळाला आले. मंगळवेढा आणि मुंढेवाडी शिवारातील तमाम शेतकरी बांधवांनी हा रस्ता व्हावा म्हणून ईश्वराकडे साकडे घातले असेल पण समाधान यांच्या रूपाने तो शेतकऱ्यांचा देव आज कामाच्या माध्यमातून तमाम जनतेच्या समोर उभा ठाकला आहे. या कामाचं श्रेय त्यांना तर जायलाच हवं परंतु त्यासोबत प्रयत्न करणाऱ्या सर्व कुणबी शेतकऱ्यांनाही जायला हवं. कारण त्यांचा जनरेटा हा समाधान आवताडे यांना काम पूर्ण होण्यासाठी उत्तेजित करत होता. शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाला जागून समाधान आवताडे आपल्या तत्वाने वागून आज दिला शब्द खरा केला. वर्षभरापासून आमदार साहेबांनी कामाची आखणी करून, अडचणीवर मात करून सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधानाची झालर दिसावी, सुखाचा घास घेता यावा, शेतातून तयार होणारं पीक घरी नीट आणता यावा यासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न शेतकरी बांधव कधीही विसरणार नाहीत. मंगळवेढा मुंढेवाडी या रस्त्याची किती गरज होती हे पटवून देण्यामध्ये मंगळवेढा आणि मुंढेवाडी शिवारातील तमाम शेतकरी बांधव कुठे कमी पडले नाहीत त्याला प्रतिसाद म्हणून आमदार समाधान दादा आवताडे हेही कुठे कमी पडल्याचे दिसून येत नाही. शिवारातल्या मातीच्या पायवाटेवरून जाणाऱ्या शेतकऱ्याला रस्ता होणार आहे असं म्हटल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद झळकला आहे. मातीच्या रस्त्यावरून जाताना पायवाट तयार करण्यापेक्षा भक्कम डांबरी रस्त्यावरून शेतकऱ्यांना सुखानं जाता यावं यासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्न आज फळास आला. गोफणबाई रस्ता, मुंढेवाडी रस्ता मंगळवेढ्यापासून केवळ सात किलोमीटर अंतरावर असताना या रस्त्याची झालेली दुर्दशा आमदार साहेबांच्या कानावर गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्याकडून घातली गेली आणि घातली जात आहे. त्वरित निधी मंजूर करून वाटेवरील चिलारं, मुरमीकरण हे काम त्यांनी केव्हांच सुरू केलं आहे. याला कामाच्या निष्ठेचं फळ म्हणून आज तो रस्ता डांबरी होत आहे. शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सुखकर दळणवळण होण्यासाठी, शेतकऱ्याचे स्वप्न साकारण्यास अवताडे यांच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे, असं म्हणणं योग्य ठरेल. प्रामाणिकपणांन केलेल्या, तळमळीनं केलेल्या कामाच्या मोबदल्याचं वाण शेतकऱ्यांच्या आशीर्वादाच्या रूपाने समाधान दादा अवताडे यांना निश्चितच भविष्यात मिळेल याबाबत तिळमात्र शंका नाही. आणि हो, केलेल्या कामाचं कौतुक शेतकऱ्यांनी नाही करायचं, तर आणखी कोणी करायचं ?
35 ते 40 वर्षांपूर्वी स्वर्गीय शंकर पाटील यांच्या सहकार्याने आणि माझ्या वडिलांसह म्हणजे सि. बा. यादव सर यांचेसह मंगळवेढ्यात स्थायिक असलेला सर्व शेतकरी वर्ग आणि मुंढेवाडी शिवारातील सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या रस्त्याचा प्रवास आज आमदार आवताडे यांच्या रुपाने पूर्ण होत आहे ही केवढी समाधानाची बाब आहे. वर्तमानामध्ये सर्व ज्येष्ठ, थोर गुरुजनांनी, युवकांनी या कार्यासाठी आपला वेळ खर्ची घातला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या मी ऋणात राहणे पसंत करेन.
समस्त मंगळवेढा आणि मुंढेवाडी पंचक्रोशीतील तमाम कुणबी शेतकऱ्यांच्या वतीने आमदार समाधान दादा आवताडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यास सर्व शेतकऱ्यांकडून लाख लाख शुभेच्छा.
मनपूर्वक धन्यवाद.
—————————————-
शिवश्री गणेश यादव
विभागीय अध्यक्ष
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,
सोलापूर 9860001292
[…] […]