आनंदाची बातमी ; राज्यातील शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा 

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय : ४९५६२ शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दसऱ्याची गोड भेट

मुंबई, दि.१०: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यावेळी सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी अंशतः अनुदानित शाळांना २० टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. निकषांची पूर्तता केलेल्या ८२० प्राथमिक शाळा, ३५१३ वर्ग/ तुकड्या व त्यावरील ८६०२ शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, १९८४ माध्यमिक शाळा, २३८० वर्ग किंवा तुकड्या व त्यावरील २४०२८ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, ३०४० उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, ३०४३ वर्ग, तुकड्या, अतिरिक्त शाखा व त्यावरील १६९३२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, (एकूण ५८४४ शाळा, ८९३६ वर्ग/तुकड्या/अति.शाखा व त्यावरील एकूण ४९५६२ शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी) अनुदानाच्या विविध टप्पावर वेतन अनुदान घेत आहेत, त्यांना २० टक्के अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात आला.

👉 मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय –

✅ वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार

✅ सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता

✅ महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा

✅ कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय

✅ राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता.

✅ राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार

✅ जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणूकीस मुदतवाढ

✅ सिडको महामंडळ व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिलेले भूखंड कब्जेहक्काने रुपांतरीत करणार

✅ केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना राबवणार

✅ मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी

✅ पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला

✅ बोरिवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी

✅ महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा

✅ कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला

✅ बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्प

✅ पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना

✅ भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित

✅ रमाबाई आंबेडकरनगर मधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खासगी जमिनीचा मोबदला देणार

✅ मराठवाड्यातील शाळांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधी

✅ राज्यात आंतररष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी

✅ न्यायमुर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्ग

✅ नाशिकरोड, तुळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय

✅ नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार

✅ महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा

✅ शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी.

✅ देवळालीतील भूखंड नाशिक रोडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला

✅ मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ

✅ मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ

✅ पिंपरी चिंचवड पोलीसांच्या परेड ग्राऊंडसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा

✅ समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता

✅ कात्रज – कोंढवा उड्डाणपुलास बाळासाहेब देवरस यांचे नाव

✅ आपत्ती सौम्यीकरणाची कामे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत

✅ राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी

✅ शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे

✅ पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे

✅ कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता

✅ सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची सुविधा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here