मंगळवेढा, दि.१० : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत संविधान भवन योजनेअंतर्गत मरवडे येथील तक्क्याच्या जागी 20 लाख रुपयाचे सामाजिक न्याय भवन बांधण्यासाठी निधी आमदार समाधान आवताडे यांनी उपलब्ध करून दिला असल्याने बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारी ही मागणी पूर्ण झाल्याने आमची प्रलंबित मागणी पूर्ण केली आता आम्ही तुमचेच असे म्हणत आतापर्यंत भालके गटात असलेले मरवडेचे माजी उपसरपंच हणमंत शिवशरण यांनी आमदार आवताडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
हणमंत शिवशरण यांनी उद्योजक संजय आवताडे यांची भेट घेत आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना शिवशरण म्हणाले की, गेल्या सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत होतो त्या पाठपुराव्याला यश आले असून आपल्या आमदार समाधान आवताडे यांनी आमची मागणी पूर्ण केली आहे. बऱ्याच वर्षापासून मरवडेकरांची मागणी असताना या योजनेतून एक रुपयाही आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर निधी मिळाला नव्हता परंतु आमदार समाधान आवताडे यांनी मागणीची दखल घेऊन मंगळवेढा तालुक्यातील बारा गावांमध्ये व पंढरपूर तालुक्यातील 22 गावांमध्ये वीस लाख रुपये प्रमाणे पाच कोटी निधी दिला आहे.
आमदार समाधान आवताडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीस मुबलक निधी देऊन वंचित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे दोन्ही तालुक्यातून आम्ही आभार त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील कार्यास शुभेच्छा देतो.
माजी उपसरपंच हणमंत शिवशरण आमच्या आमदार समाधान आवताडे यांच्या आवताडे गट प्रवेशावेळी मरवडे ग्रामपंचायत सदस्यपती समाधान ऐवळे माजी सरपंच जगन्नाथ मासाळ माजी उपसरपंच रजाकभाई मुजावर, सुभाष पाटील, युवकनेते सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.