मंगळवेढा, दि.२६ : शरदनगर (ता.मंगळवेढा) येथील शरद पवार विदयालय, शरदनगर- मल्लेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व प्रशालेस संगणक संचाची भेट एस.आर. इनिशिएटिव्ह एफिनिटी एक्स प्रा. लि. पुणे व उर्मि फॉऊडेशन यांच्यावतीने देण्यात आली.
एस.आर. इनिशिएटिव्ह एफिनिटी एक्स प्रा. लि. पुणे व उर्मि फॉऊडेशन यांच्याकडून इयत्ता पाचवी ते बारावी मधील गरीब व गरजू शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आल्याने याचा निश्चितच चांगला फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच प्रशालेस संगणक संच भेट देण्यात आल्यामुळे विद्यार्थी व इतर शैक्षणिक कामासाठी या साधनाचा वापर होणार असल्याने याबाबत पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी एस.आर. इनिशिएटिव्ह एफिनिटी एक्स प्रा. लि. पुणेचे दत्तात्रय इंगळे, उर्मी फाउंडेशनचे राहुल शेंडे, जयमल्हार शिक्षण प्रसारक मंडळ मारापुरचे अध्यक्ष प्रथमेश पाटील, सचिव बळवंतराव पाटील, मुख्याध्यापक पंढरीनाथ माने, मंगळवेढा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवकांची पत संस्था मर्यादित मंगळवेढाचे माजी अध्यक्ष भारत रायबान व प्रशालेतील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
एस.आर. इनिशिएटिव्ह एफिनिटी एक्स प्रा. लि. पुणे व उर्मि फॉऊडेशन यांच्यावतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व प्रशालेस संगणक संचाची भेट हा उपक्रम खूपच कौतुकास्पद असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात विविध सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.
– भारत रायबान,
माजी अध्यक्ष, मंगळवेढा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवकांची पतसंस्था मर्यादित मंगळवेढा.