मनसे केसरी 2024 : मनसे नेते दिलीप धोत्रे यांची कुस्त्यांच्या आखाड्याबरोबर निवडणुकीच्या आखाड्यातही एन्ट्री

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या शुभहस्ते फुटणार प्रचाराचा नारळ 

मंगळवेढा, दि.२० : मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मनसे केसरी 2024 च्या निमित्ताने कुस्ती आखाड्याचे नियोजन करीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या आखाड्यातही जोरदार एन्ट्री केली आहे.

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संयोजनाखाली मंगळवेढा येथे रविवार दिनांक 22 रोजी दुपारी ठीक तीन वाजता मनसे केसरी 2024 या कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले असून या आखाड्याचे उद्घाटन मनसे नेते तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुरुवातीपासून पक्षाशी एकनिष्ठ राहत व मनसे नेते राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेसाठी काम करीत दिलीप धोत्रे यांनी पक्षनेते राज ठाकरे यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या मनात जागा निर्माण केली आहे. त्याचेच फळ म्हणून महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी मनसेच्या वतीने उमेदवार म्हणून दिलीप धोत्रे यांना प्रथम पसंती देण्यात आली आहे. आता मनसे केसरी 2024 चा उदघाटन समारंभही मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने उद्घाटन सोहळा मनसे च्या प्रचाराचा शुभारंभ मानला जात आहे.

मनसे केसरी 2024 च्या निमित्ताने बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितलेली की, आपण गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवीत आहोत. पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बेरोजगार तरुणांना काम देण्याचा आपला माणस आहे. महिलांनाही रोजगारासाठी भटकंती करावी लागते ही भटकंती त्यांच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी त्यांना त्यांच्या घरीच काम करून कष्टाची भाकर कशी निर्माण करता येईल यासाठी आपले नेहमीच प्रयत्न राहतील. कोणतेही काम करत असताना कधीही पक्षभेद मानला नाही, नेहमीच प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करून त्यांचे प्रश्न सोडविले. मनसे कहो दिलसे हा नारा पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येकापर्यंत पोहोचला असून यांची सोबत नेहमीच आपल्याबरोबर राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here