शिक्षकांच्या मागण्यांबाबत तातडीने शासन निर्णय ; शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिले आश्वासन

प्राथमिक शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांची दिपक केसरकर यांच्यासोबत बैठक

मुंबई, दि: 19 : नवीन अभ्यासक्रम आराखडा व संशोधन तसेच प्राथमिक शिक्षकांचे काही ज्वलंत प्रश्न या बाबत मंत्रालयात शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या समवेत सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांची थोड्या वेळापूर्वी बैठक संपन्न झाली असून, या बैठकीमध्ये अनेक सकारात्मक निर्णय व आश्वासन शिक्षण मंत्री दिपक केसरकर दिले आहेत.

राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांची शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या सोबत तातडीची व अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून, शिक्षण मंत्री महोदयांनी या बैठकीमध्ये पुढील निर्णय घेऊन तातडीने जीआर निर्गमित केले जातील असे आश्वासन दिले आहे.

 

यावेळी त्यांनी 1] संच मान्यता जुन्या जीआर प्रमाणेच केली जाईल.

2) पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेला 100 विद्यार्थ्यांना एक मुख्याध्यापकाचे पद मंजूर केले जाईल.

3] सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा नियुक्ती दिली जाणार नाही.

4] 24 वर्ष सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना विनाअट निवड श्रेणी मंजूर केली जाईल. त्या संदर्भाचे आदेश तातडीने निर्गमित केले जातील.

4) नवीन शिक्षक भरती सुरू राहील.

आदी विषयाचे तातडीने जीआर निर्गमित केले जातील. असे स्पष्ट आश्वासन शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिले आहेत. यासोबतच इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांना लवकरच न्याय मिळण्याची शक्यता आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here