वाचाळवीर आमदारांना आवरा ; मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान : आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्यावर कारवाई करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी

मंगळवेढा, दि.१९ : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बद्दल भाजपचे राज्यसभा सदस्य अनिल बोंडे व आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान करून लोकशाहीला घातक असे वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीर आमदारांना आवर घालावा अन्यथा अशा व्यक्तींना राजकिय जीवनातून हद्दपार करावे. या व्यक्तींना संरक्षण देणे व खतपाणी घालने हेही धोकादायक आहे. या दोघांवर कडक कारवाई करावी व त्यांना अटक करावी अशी मागणी मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत साळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुका पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरली यावेळी सदर निवेदन मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवण यांना देण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील, अमोल म्हमाणे, जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव ,ओबीसी तालुका अध्यक्ष पांडूरंग माळी, शहर अध्यक्ष पांडूरंग निराळे, शिवसेना माजी अध्यक्ष तुकाराम कुदळे, महीला शहर अध्यक्ष आयेशा शेख, शहर उपाध्यक्ष अमिना पटेल, माजी नगरसेविका सूनीता अवघडे, शहर कार्याध्यक्ष इसाक शेख, युवक तालुका अध्यक्ष ॲड. रविकिरण कोळेकर, शहर अध्यक्ष मनोज माळी, कृषीतज्ञ अजय आदाटे हाजापुर चे माजी सरपंच धनाजी बिचुकले, तालुका उपाध्यक्ष सत्तार इनामदार व पंडीत पाटील ,शहर उपाध्यक्ष तसलीम अकुंजी, उचेठानचे माजी सरपंच हरिभाऊ गडदे शहाजी कांबळे ,राजाभाऊ ठेंगील व मंगळवेढा तालुका काँग्रेसचे प्रसिद्ध प्रमुख संदीप पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here