सोलापूर, दि.15 : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेवून सोमवार, दि. 16/09/2024 रोजी जाहिर केलेली सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करुन बुधवार दि. 18/09/2024 रोजी जाहिर करावी याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा असे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद ची सुट्टी सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजीच कायम ठेवण्यात येत असल्याबाबतचा निर्णय सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी जाहीर केलेला आहे.
राज्य शासनाने 09, नोव्हेंबर 2023 च्या राजपत्रानुसार अधिसूचित केलेल्या सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजी दर्शविण्यात आलेली होती. ईद-ए-मिलाद ची दि.16/09/2024 ची शासकीय सुट्टी शासनाने दि.13/09/2024 चे अधिसूचनेद्वारे मुंबई शहर व उपनगर या क्षेत्रांमध्ये रद्द करुन ती दि. 18/09/2024 रोजी जाहिर केली आहे. तसेच इत्तर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करुन बुधवार दि. 18/09/2024 रोजी जाहिर करावी याबाबत निर्णय घेणेबाबत नमूद केले आहे.
शासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचनेस अनुसरुन सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय यांनी चौकशी केली असता पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण हद्दीमध्ये बहुतांश ठिकाणी दि.16/09/2024 रोजी मिरवणुका / पदयात्रा / रॅलींचे आयोजन केले आहे. तसेच पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांचे हद्दीमध्ये दि.19/09/2024 रोजी बहुतांश ठिकाणी मिरवणुका / पदयात्राचे आयोजन केलेचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शासनाचे दि. 09/11/2023 चे अधिसूचनेद्वारे जाहिर केलेली ईद-ए-मिलाद ची दि.16/09/2024 ची सुट्टी कायम ठेवण्यात येत आहे. तसेच ईद-ए-मिलाद निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छाही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावतीने देण्यात आल्या आहेत.